विद्यार्थिनीचा उठाबशा काढल्याने मृत्यू; गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख निलंबित
वसई : खरा पंचनामा
शाळेत येण्यास उशीर झाल्याने वसईतील एका शाळेत विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली, उठाबशा काढल्याने एका सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीला त्रास झाला आणि तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
या प्रकरणी तात्काळ वरिष्ठ कार्यालयात माहिती न देणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यासोबतच, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत वसईचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख अशा तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
वसई पूर्वेच्या सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर या शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षिकेने उठाबशा काढण्याची शिक्षा काही विद्यार्थ्यांना दिली होती. त्यात सहावीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा समावेश होता. तिची तब्येत बिघडून १५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या मृत्यू प्रकरणानंतर त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले होत. याशिवाय या प्रकरणी वालीव पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करत अटक देखील केली होती.
तर दुसरीकडे जिल्हा शिक्षण विभागातर्फे चौकशी समिती स्थापन करून चौकशी सुरु केली होती. मात्र याच दरम्यान शाळेच्या इमारतीत अनधिकृतरित्या इयत्ता नववी आणि दहावीचे वर्ग भरत असल्याचे देखील शिक्षण विभागाला निदर्शनास आले होते. त्या नंतर या शाळेची इमारत अनधिकृत असल्याचे आणि शाळेमध्ये इयत्ता नववी आणि दहावीचे अनधिकृत वर्ग भरत असल्याचे समोर आले होते.
तर शाळाच अनधिकृत जागेवर भरत असल्याची बाब देखील चौकशीमध्ये समोर आली होती. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून या शाळेत अनधिकृत वर्ग सुरु असल्याची आणि शाळा अनधिकृत जागेवर भरत असल्याबाबत तालुका शिक्षण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नसल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
या प्रकरणी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत वसई प्रभारी गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे, वसईतील वालीव केंद्र प्रमुख कैलास चव्हाण आणि वसई पंचायत समिती विस्तार अधिकारी (शिक्षण) राजेंद्र उबाळे यांना निलंबन करण्यात आले आहे.
शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण तात्काळ वरिष्ठ कार्यालयात न कळविणे, शाळा बालकांचा मोफत व सक्तीचा अधिकारी नियमातील तरतुदीचे पालन न करणे, शाळा अनधिकृत जागेवर सुरु असून शाळेत इयत्ता आठवी आणि नववी चे वर्ग अनधिकृतपणे सुरु असूनही वरिष्ठ कार्यालयात न कळविणे आणि त्यावर कोणतीही कार्यवाही न करणे तसेच सदर शाळेमध्ये प्रशिक्षित शिक्षण नसणे यासह असे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका या तीनही अधिकाऱ्यांवर लावण्यात आला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी प्राथमिक शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील आणि समितीने केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.