Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी चोख बंदोबस्तराजकीय पक्षांनाही जागता पाहरा ठेवण्याची मुभा

मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणी चोख बंदोबस्त
राजकीय पक्षांनाही जागता पाहरा ठेवण्याची मुभा

मुंबई : खरा पंचनामा

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची येत्या २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तोवर मतदानयंत्रे ठेवलेल्या ठिकाणी (स्टाँग रुमबाहेर) सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवावा, गोदामांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

निवडणूक लढविणारे उमेदवार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधींना मतदान यंत्र साठवणूकीच्या परिसरात जागता पाहरा देण्याचीही मुभा देण्यात आली आहे.

राज्यातील २४६ नगरपालिका ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करताना राज्य निवडणूक आयोगाने या सर्व ठिकाणी ३ डिसेंबरला मतमोजणी होईल अशी घोषणा केली होती. काही नगरपालिकांमधील उमेदवारी अर्ज छाननीचा वाद न्यायालयात गेल्यामुळे आयोगाने शनिवारी एका आदेशान्वये न्यायप्रविष्ठ प्रकरणातील २४ नगरपालिका व नगरपंचायती आणि १५४ सदस्यांची निवडणूक स्थगित केली होती. ही निवडणूक आता २० डिसेंबरला घेण्याचे आदेश आयागाने दिल्यानंतर सर्व परिषदांची निवडणूक झाल्याशिवाय मतमोजणी होऊ नये अशी मागणी करीत काही उमेदवारांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होत.

त्यावर २४ नगरपालिका-नगरपंचायती आणि १५४ सदस्यांची निवडणूक झाल्याशिवाय मतमोजणी करु नका, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आता सर्व नगरपालिका-नगरपंचायतींची २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.. मतदान यंत्रांच्या सुरक्षितेतेसाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेशही आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मतदान यंत्र साठवणूक केलेल्या गोदामांच्या साठवणूक व व्यवस्थापनाकरिता जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. त्या ठिकाणी सीसीटिव्ही, सुरक्षा अलार्म यंत्रणा बसवावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामांच्या परिसरात २४ तास सशस्त्र चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करावी. साठवणुकीच्या ठिकाणी केवळ व अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा व अशा प्रवेशाचा तपशिल लॉगबुकमध्ये नोंदविण्यात यावा. राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना मतदान यंत्रे ठेवलेली जागा व सुरक्षा व्यवस्थाबाबत माहिती देऊन आवश्यकतेप्रमाणे व त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना सुरक्षेबाबत पाहणी करण्याची मुभा द्यावी. तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधींना मतदान यंत्रे ठेवलेल्या गोदामांचेप्रवेशद्वार दिसेल अशा ठिकाणी बसण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी. या ठिकाणी राजकीय पक्षांना जागता पाहरा ठेवता येईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.