महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण : निवृत्त न्यायाधीशांच्या समितीची स्थापना
सातारा : खरा पंचनामा
फलटण येथील वैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने आज चौकशी समिती नेमली आहे.
फलटण येथील वैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी संशयित आरोपी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक गोपाल बाळासाहेब बदने (रा. चांदापूर, ता. परळी, जि. बीड, हल्ली रा. बिरदेवनगर जाधववाडी, ता. फलटण) व प्रशांत किसन बनकर (रा. बनकर निवास लक्ष्मीनगर, फलटण, ता. फलटण) हे दोघेही संशयित न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने यापूर्वी राज्य राखीव दलाच्या समादेशक तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केले आहे. राज्यातील विरोधी पक्ष, विविध सामाजिक संस्था व नातेवाइकांकडून निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार आज शासनाने निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.