Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांची एलसीबी प्रभारी पदाची हॅट्रिक!१४८० गुन्ह्यांचा छडा लावत केला ७७ कोटींचा मुद्देमाल जप्त

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांची एलसीबी प्रभारी पदाची हॅट्रिक!
१४८० गुन्ह्यांचा छडा लावत केला ७७ कोटींचा मुद्देमाल जप्त

सांगली : खरा पंचनामा

एलसीबीचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात एलसीबीचे प्रभारी निरीक्षक म्हणून त्यांनी तीन वर्षे चार महिन्यांचा इतका मोठा कालावधी यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्यामुळेच त्यांनी एलसीबीचे प्रभारी अधिकारी पदाची हॅट्रिक साधली आहे. या तीन वर्षांच्या काळात 1 हजार 480 गुन्ह्यांचा छडा लावत तब्बल 77 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात निरीक्षक शिंदे यांना यश आले आहे.

ऑगस्ट २०२२ मध्ये श्री. शिंदे यांनी एलसीबीचा पदभार स्विकारला. त्यानंतर खून, दरोडे, घरफोड्यांसह अनेक गंभीर गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला. नशामुक्त सांगली अभियानासाठी एलसीबीच्या टीमने अत्यंत प्रभावी कामगिरी केली. त्यांच्या पथकाने खुनासहित दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यात तिघांना अटक केली. तसेच ३५ खुनातील ७६ आरोपींना जेरबंद करण्यात आले. जबरी चोरीचे ६० गुन्हे उघडकीस आणून ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरोड्याचे ९ गुन्हे उघडकीस आणले, त्यात ७ कोटींचा मुद्देमाल जप्त केला. रिलायन्स ज्वेल्स या सराफी दुकानातील दरोड्यात त्यांच्या पथकाने मुख्य सूत्रधारासह अन्य संशयितांना बिहारमधून अटक करण्यात आली होती. गावठी पिस्तूल, कोयता, तलवारी बाळगणारे व तस्करी करणाऱ्या ७२ जणांना गजाआड करण्यात आले. या तीन वर्षात १ हजार ४८० गुन्ह्यांचा छडा लवण्यात यश आले. त्यातील १ हजार ४५२ गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ७६ कोटी ९७ लाख ७७ हजार ८४१ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मिरज तालुक्यातील तुंग येथील खून अत्यंत क्लीष्ट होता. आंध्रप्रदेशमध्ये दरोडा टाकणाऱ्या टोळीला शिताफीने गजाआड केले. कुख्यात गुंड म्हमद्या नदाफलाही कोल्हापूर जिल्ह्यातून जेरबंद केले. नशेखोरीविरोधात व्यापक मोहीम एलसीबीने हाती घेतली. त्यामध्यमातून विट्यातील एमडी ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकला. तसेच गांजा, नशेच्या गोळ्या, ई-सिगारेटसह तब्बल तीस कोटींचा मुद्देमाल जप्त केला. या कामगिरीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निरीक्षक सतिश शिंदे आणि त्यांच्या पथकाचे कौतुक केले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.