Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विजयस्तंभ अभिवादन दिनासाठी पोलिस प्रशासनाची तयारी पूर्ण कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी घेतला बंदोबस्तासह तयारीचा आढावा

विजयस्तंभ अभिवादन दिनासाठी पोलिस प्रशासनाची तयारी पूर्ण कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी घेतला बंदोबस्तासह तयारीचा आढावा 

पुणे : खरा पंचनामा 

विजयस्तंभ अभिवादनासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायींना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये यासाठी प्रत्येक विभागाने काळजीपूर्वक व कसून तयारी करावी, अशी सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिल्या आहेत. तसेच अभिवादन दिनाची तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी 'खरा पंचनामा'शी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्तासह अन्य तयारीचा आढावा घेतला.
महानिरीक्षक फुलारी म्हणाले, विजयस्तंभ हा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्ग हम रस्त्याचे लगत असल्याने हम रस्त्यावर होणारी लोकांची गर्दी विचारात घेता, वाहतुकीकरीता पर्यायी रस्त्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. पर्यायी मार्गाचे फलक ठळकपणे दिसतील असे लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यायी वाहतूक करण्यात येणाऱ्या नियोजीत रस्त्यावरील चौकात, गल्लीत योग्य पोलीस बंदोबस्त नेमून, वाहतुकीचे नियोजन करावे. जयस्तंभ स्फुर्तीस्थान, अभिवादन मार्गीका व पार्किंग ठिकाणी वेळोवेळी घातपात विरोधी तपासणी करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

गर्दीचे व्यवस्थापन करण्याकरीता गर्दी नियंत्रण व्यवस्थापन प्रणाली मधील आदर्श सूचनांचे पालन करुन गर्दीचे नियोजन करावे. विजयस्तंभास अभिवादन करण्याकरीता येणाऱ्या लोकांची संख्या पाहता एक दिशा मार्गक्रमण मार्गीका तयार करुन एकाच दिशेने लोक येतील व अभिवादन करुन एकाच स्वतंत्र दिशेने परत जातील अशी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले. लोकांना मार्गदर्शन करण्याकरीता व सूचना देण्याकरीता प्रभावी सार्वजनिक ध्ननिक्षेपक यंत्रना कार्यन्वीत करण्यात यावी. त्यावरुन गर्दीचे व वाहतुकी बाबतच्या सूचना दिल्या आहेत. अभिवादन ठिकाण, अभिवादन मार्गीका, पार्किंगचे ठिकाणे या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी तसचे अचानक लाईट गेल्यास पर्यायी लाईट व्यवस्थेसाठी जनरेटरची उपलब्धता करुन ठेवण्यास सांगितले आहे. गर्दीचे टप्पे तयार करुन, दर्शन व्यवस्था टप्याटप्याने करण्यात यावी. मोकळया जागा तयार करुन ठेवण्यात अशा जागा आपत्‌कालीन वेळी वापरता येतील अशी व्यवस्था तयार करुन ठेवावी. अग्निशामक दल, अॅब्युलन्स, फिरती वैद्यकीय पथके यांच्या जागा निश्चित करुन त्यांना विनाअडथळा कार्यरत राहता येईल अशी व्यवस्था सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

पार्किंग ठिकाण ते विजयस्तंभ अशी सार्वजनिक बस वाहतुक व्यवस्था करण्यात येते, त्याकरीता सदर सेवा विनाअडथळा सुरु राहील याकरीता मार्गीका तयार करुन वाहतुक नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा आपत्‌कालीन कक्षाची जिल्हा प्रशासनाच्या वतीने निर्मिती करुन लोकांना त्याबाबत ध्ननिक्षेपकाव्दारे माहीती देण्यात येणार असल्याचे फुलारी यांनी सांगितले.

संपुर्ण अभिवादन परिसरात CCTV कैमेरे बसविण्यात आले असून त्याकरीता स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे संपूर्ण अभिवादन परिसरावर निगराणी ठेवता येणार आहे. साध्या वेशातील पोलीस कर्मचारी बंदोबस्त / पेट्रोलिंग कामी नेमले आहेत. ज्या पोलीस कर्मचारी यांनी यापुर्वी शिक्रापुर, लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत नोकरी केलेली आहे अशा माहितगार कर्मचारी यांना बंदोबस्तकामी नेमण्यात आले आहे. दंगल विरोधी कवायती घेवुन कोणत्याही दंगलसदृश्य परिस्थिती हाताळण्यास दंगल विरोधी पथकास सुसज्ज राहण्याबाबत सुचना दिल्या आहेत. दंगल नियंत्रण पथक व स्ट्रायकिंग फोर्स तात्काळ उपलब्ध होतील अशा ठिकाणी नेमावे अशा सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.

वढु बु. व कोरेगांव भिमा या संवेदनशील गावांमध्ये बंदोबस्ताकरीता अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक नेमताना सदर बंदोबस्ताचा पूर्व अनुभव असलेले पोलीस अधिकारी यांना नेमण्यात येणार आहे. विजयस्तंभ शौर्य दिनाचे वेळी चिथावणी खोर भाषणे, आक्षेपार्ह घोषणा, सोशल मीडियावर व्हायरल होणारे संदेश यावर सतत २४ तास लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याचे महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले.

नेमण्यात आलेला बंदोबस्त 
अ.पो.अ : ०७
डीवाय एसपी : 23
पो.नि. : ६७
सपोनि /पोउपनि २५५
पोलीस अंम : ३०९४
वा. अंम : २५०
एसआरपी कंपनी : ०४
होमगार्ड : १५००
बीडी डीएस : ०७

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.