सांगलीत रविवारी 'सांगली मॅरेथॉन' स्पर्धा
तीन हजार स्पर्धक सहभागी होणार : डॉ. गणेश चौगुले
सांगली : खरा पंचनामा
मॅरेथॉन पर्व ४ ही स्पर्धा रविवार दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ५ ते १० या वेळेत आयोजित केली आहे. गेल्या ३ वर्षांपासून या स्पर्धेला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. राधेय सेवा फाउंडेशन, सांगली यांच्या वतीने विजेता ग्रुप सांगली मॅरेथॉन स्पर्धा सेवासदन हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित केली आहे, अशी माहिती फाउंडेशनचे डॉ. गणेश चौगुले यांनी दिली.
स्पर्धेचे मुख्य स्थळ कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशाला ग्राऊंड (के.पी.एस.पी.), चिंतामण कॉलेज जवळ, सांगली असेल. या मॅरेथॉनमध्ये ३५ किमी व ३ किमी अशा विविध अंतरांमध्ये स्पर्धा होणार आहेत. सुमारे ३००० हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा मुख्य उद्देश नागरिकांनी स्वतःच्या आरोग्यासोबतच आपल्या कुटुंबाच्या व समाजाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, हा असून फिट व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजात पोहोचवणे हा आहे.
या मॅरेथॉनसाठी सुमारे दीड लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून, सहभागी प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट, मेडल, बॅग, नाष्टा, प्रमाणपत्र तसेच संपूर्ण मार्गावर हायड्रेशन व रुट सपोर्ट देण्यात येणार आहे. ही स्पर्धा केवळ सांगलीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण देशभरातून तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून धावपटू सहभागी होत आहेत.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, जिल्हाधिकारी अशोक काकडे, आयुक्त सत्यम गांधी, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह डॉ. विश्राम लोमटे, प्रसाद दीक्षित, सिद्धार्थ गाडगीळ, कांतीलाल मारवाडी, नितीन मुळीक, संजय परमणे, सागर बिरनाळे, डॉ. सुनील काटे, डॉ. सुरेश वाघ, सुदर्शन कोष्टी, दिगंबर जगताप, सुरेंद्र बोळाज, भाव्या सत्रा तसेच जिल्ह्यातील विविध संघटनाचे अध्यक्ष व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
विजयनगर चौक भारती विद्यापीठ - गांधी चौक तेथून परत के.पी.एस.पी. ग्राऊंड विश्रामबाग चौक मार्केट यार्ड पुष्पराज चौक - राम मंदिर - काँग्रेस भवन - राजवाडा चौक पटेल चौक गणपती मंदिर टिळक चौक आयर्विन पूल - तेथून परत त्याच मार्गे के.पी.एस.पी. ग्राऊंड.
ही मॅरेथॉन आपल्या सांगली जिल्ह्याची मॅरेथॉन असून, 'यलो सिटी सांगली' ही ओळख देश-विदेशात पोहोचावी यासाठी सांगलीकरांनी सकाळी स्पर्धा मार्गावर उभे राहून धावपटूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांगली मॅरेथॉनचे मुख्य सल्लागार मार्गदर्शक गिरीश चितळे, इव्हेंट चेअरमन डॉ. रविकांत पाटील, राधेय सेवा फाउंडेशन, सांगलीचे अध्यक्ष डॉ. गणेश चौगुले, आयोजक राधेय सेवा फाउंडेशन व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.