Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चार मुलं जन्माला घाला : नवनीत राणासुरुवात स्वतःपासून करा : सुषमा अंधारे

चार मुलं जन्माला घाला : नवनीत राणा
सुरुवात स्वतःपासून करा : सुषमा अंधारे

मुंबई : खरा पंचनामा

भाजप नेत्या नवनीत राणा यांनी देशातील हिंदूना एका मुलावर संतुष्ट न राहता, तीन ते चार मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला होता. एका मौलानाने 4 बायका आणि 19 मुलं असल्याचे सांगितले असल्याचा दाखला देत नवनीत राणा यांनी केलेल्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

नवनीत राणा यांच्या या विधानावर विविध प्रतिक्रिया येत असून त्यातच ठाकरे गटाच्या नेत्या, सुषमा अंधारे यांनीही त्यांच्या खास शैलीत त्यांना टोला लगावला आहे.

सुषमा अंधारे यांनी फेसबूकवरील त्यांच्या अकाऊंटवर एक पोस्ट करत नवनीत राणांनाही एक सल्लाही दिला आहे. 4 मुलं जन्माला घाला असं सांगणाऱ्या नवनीत राणां यांना सुषमा अंधारे यांनी 'शुभस्य शिघ्रम' असं म्हणत स्वतः पासून याची सुरुवात करायला हवी असा सल्ला दिला.

नवनीत राणा यांच्या विधानाच दाखल देत सुषमा अंधारे म्हणाल्या, 'अतिशय चांगला विचार आहे... शुभस्य शिघ्रम... याची सुरुवात नवनीत राणा यांनी स्वतः पासून करायला हवी. पण डोहाळ जेवणाची जबाबदारी मात्र माझी आणि यशोमती ठाकूर ताईंची ची हं'. 'आफ्टर ऑल लाडक्या भावजयीचे लाड आम्ही नाही पुरवायचे तर कोणी..?' असं म्हणत राणा यांना खोचक टोला लगावला आहे.

'एक मौलाना आहेत, ते खुलेआम असं म्हणतात की मला 4 बायका आणि 19 मुलं आहेत. मला 30-35 मुलं हवी होती, पण तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची मला लाज वाटते', असं ते म्हणाल्याचं नवनीत राणांनी सांगितलं. यावर नवनीत राणा म्हणाल्या की, "मी सगळ्या हिंदूंना सांगते, ते जर खुलेआम म्हणतात की 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-4 मुलं जन्माला घातली पाहिजेत. त्यांचा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तानला बनवायचा आहे. ते मोठ्या संख्येने मुलं जन्माला घालत आहेत, तर मग आपण एका मुलावर का संतुष्ट राहतो? आपणही तीन ते चार मुलं जन्माला घातली पाहिजेत," असा अजब सल्ला नवनीत राणा यांनी दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.