भाजपने शरद मोहोळच्या पत्नीला कोथरूडमधून दिली उमेदवारी
पुणे : खरा पंचनामा
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून आता सर्वच पक्षांचं चित्र स्पष्ट होण्यास सुरूवात झाली आहे. पुणे शहर गुन्हेगारीमुक्त व्हावं अशी सर्वसामान्य माणसांकडून अपेक्षा व्यक्त होत असताना अजित पवारांनी मात्र सराईत गुन्हेगार महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवण्यास सुरुवात केली आहे. गजानन मारणे, बंडू आंदेकर, पिंटू धावडे, रोहीदास चोरगे आणि बापू नायर यांना उमेदवारी देऊन पुण्यात खळबळ उडवून दिली आहे. अशातच आता भाजपने देखील राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल टाकलंय.
भाजपने प्रभाग क्रमांक 11 मधून स्वाती शरद मोहोळ यांना आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. स्वाती मोहोळ या कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी असून त्यांनी रामबाग कॉलनी आणि शिवतीर्थनगर या भागातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच शरद मोहोळची टोळीयुद्धातून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर त्याच्या पत्नीला राजकीय मैदानात उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने काही दिवसांपूर्वीच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर आता भाजपनेही तोच कित्ता गिरवला असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रभागात स्वाती मोहोळ यांच्या एन्ट्रीमुळे ही निवडणूक आता चुरशीची ठरणार आहे. या भागातील जुने कार्यकर्ते आणि मतदारांचा कौल कोणाकडे झुकणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.