मिरजेतील गुंड सोहेल ऊर्फ शाबाज सुभेदार एक वर्षाकरीता सांगली जिल्हयातून तडीपार
सांगली : खरा पंचनामा
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील सराईत गुन्हेगाराला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
सोहेल ऊर्फ शावाज बादशाह सुभेदार (वय २४, रा. खिश्चन दफनभूमी जवळ, ईदगाह नगर झोपडपट्टी, माजी सैनिक वसाहत जवळ, मिरज) असे तडीपार केलेल्याचे नाव आहे. मिरज येथे घातक हत्यारे घेवून परीसरात दहशत माजवणे, घातक हत्याराने गंभीर जखमी करणे असे शरीराविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असून त्याचेवर सदर गुन्हयांत वेळोवेळी अटकेची कारवाई तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्याचे वर्तनात सुधारणा झालेली नव्हती, एका गुन्हयातून जामीनावर बाहेर आलेनंतर तो परत दुसरा गुन्हा करीत होता. त्याचे गुन्हेगारी कृत्यामुळे जनतेचे जिवीतास व मालमतेस धोका निर्माण झालेला होता. त्याचे या गुन्हेगारी कृत्यांमुळे त्याची मिरज शहर तसेच परीसरात दहशत असलेमुळे त्याचे विरुध्द कोणीही सामान्य नागरीक तक्रार देणेस धजावत नव्हते. तो धोकादायक इसम बनलेने त्याला हद्दपार करणे आवश्यक झाले होते.
त्यामुळे त्याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी सुनावणी घेऊन मंजुरीसाठी पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. अधीक्षक घुगे यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन त्याला एक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव, अभिजीत धनगर, अभिजीत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ, मोसिन टिनमेकर, राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण यांनी या कारवाईत भाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.