Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात 'ग्लोबल केपेबिलिटी सेंटर' स्थापन करणार

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात 'ग्लोबल केपेबिलिटी सेंटर' स्थापन करणार

नागपूर : खरा पंचनामा

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील औद्योगिक विकासाला नवी दिशा देणार असून या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ग्लोबल केपेबिलिटी सेंटर (जीसीसी) स्थापन करण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी याविषयी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री डॉ. उदय सामंत बोलत होते. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्राची जीसीसी पॉलिसी ही देशातील सर्वोत्तम पॉलिसी ठरली आहे. पूर्वी जीसीसीचे मर्यादित युनिट्स देशात होते. 2021 मध्ये 12 युनिट्स तर 2025 मध्ये 19 युनिट्स होते. राज्य शासनाचा उद्देश 400 जीसीसी युनिट्सपर्यंत पोहोचण्याचा असून, त्यात पश्चिम महाराष्ट्राला मोठे प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांना जीसीसी विकासासाठी सेकंड आणि थर्ड टियर भागात प्राधान्य मिळणार आहे. कोल्हापूरची एअर कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वाढती औद्योगिक क्षमता आणि आयटी पार्कची मागणी लक्षात घेता येथे 'जीसीसी'साठी मोठी संधी आहे. सांगली-सातारा येथेही जमीन उपलब्धता, ट्रायँग्युलर लोकेशन आणि उद्योगस्नेही वातावरण हे मोठे फायदे आहेत. मोठी डेटा सेंटर क्लस्टर्स देखील या प्रकल्पात समाविष्ट जातील असे त्यांनी सांगितले. तसेच पुढील एका महिन्यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली जाईल. त्यानंतर जीसीसी स्थापनेबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

उदय सामंत यांनी राज्यातील इतर भागातील औद्योगिक वाढीची माहितीही देताना म्हणाले की, पूर्वी गडचिरोली नक्षलवादासाठी ओळखला जाणारा जिल्हा आज उद्योगनगरी म्हणून उभा राहत आहे. देशातील सर्वात मोठा स्टील हब येथे उभारला जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथे 60 हजार रोजगार निर्माण करणारा मोठा ऑटोमोटिव्ह प्रकल्प यशस्वीरीत्या आणला. कोकणात स्थानिक जनतेला महत्त्व पटवून देऊन 'मेड इन रत्नागिरी' म्हणून ओळखला जाणारा कोकाकोला प्रकल्प सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.