विशेष महानिरीक्षकांच्या आदेशाने कोल्हापूर परीक्षेत्रातील 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
7 निरीक्षक, 3 एपीआयचा समावेश : एका निरीक्षकासह तीन सहायक निरीक्षकांना मुदतवाढ
कोल्हापूर : खरा पंचनामा
बहू प्रतीक्षेत असणाऱ्या कोल्हापूर परीक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सहीने मंगळवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. प्रशासकीय आणि विनंतीनुसार करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये 7 निरीक्षक, 3 सहायक निरीक्षकांचा समावेश आहे. एका निरीक्षकासह 3 सहायक निरीक्षकांना 2026 च्या सार्वत्रिक बदल्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बदली करण्यात आलेले पोलीस निरीक्षक :
गजानन राजाराम सरगर : कोल्हापूर ते सांगली
अभिजीत सुभाष देशमुख : पुणे ग्रामीण ते सांगली
हेमंत गणपत शेडगे : सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण
राजेंद्र सदाशिव सावंत्रे : सातारा ते कोल्हापूर
सतिश हिंदुराव शिंदे : सांगली ते कोल्हापूर
स्नेहा कृष्णदेव गिरी : कोल्हापूर ते सांगली
अजित पांडुरंग सिद : सांगली ते कोल्हापूर
बदली करण्यात आलेले सहायक निरीक्षक :
विजय भागवत गोडसे : कोल्हापूर ते सातारा
धोंडीराम शिवाजी वाळवेकर : सातारा ते कोल्हापूर
पंकज दिनकर पवार : सांगली ते सातारा
मुदतवाढ देण्यात आलेले अधिकारी
निरीक्षक अविनाश शंकर शिळीमकर (पुणे ग्रामीण)
सहायक निरीक्षक :
रणजित हणमंतराव पाटील (कोल्हापूर)
मनोजकुमार सुभाषराव नवसरे (पुणे ग्रामीण)
अभिजीत रविंद्र यादव (सातारा)
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.