Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सांगली, मिरज, कोल्हापुरातील मतदान केंद्राना भेटी किरकोळ अपवाद वगळता कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीत शांततेत मतदान

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सांगली, मिरज, कोल्हापुरातील मतदान केंद्राना भेटी 
किरकोळ अपवाद वगळता कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीत शांततेत मतदान 

कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी आज मंगळवारी कोल्हापूर, सांगली, मिरजेतील विविध मतदान केंद्राना भेटी देऊन पाहणी केली. किरकोळ अपवाद वगळता कोल्हापूर, सांगली तसेच इचलकरंजी महापालिकेसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. 
महापालिका निवडणुकीसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेऊन पोलीस अधिकाऱ्यांनी सचोटी, निर्भीड आणि निपक्षपातीपणे कर्तव्य पार पाडण्याच्या सूचना महानिरीक्षक फुलारी यांनी परीक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांवर श्री. फुलारी विशेष लक्ष ठेवून होते.
आज दिवसभरात त्यांनी सांगलीतील मिरज हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, कुपवाड, पटवर्धन हायस्कूल, राजवाडा परिसर, सांगली येथील मतदान केंद्राना भेटी दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होत्या.
 तसेच कोल्हापूर येथील टेंबलाईवाडी हायस्कूल, दादासाहेब कोरगावकर हायस्कूल व इंग्लिश मिडीयम स्कूल, सदर बाजार आदी ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्यासह कोल्हापुरातील अधिकारी उपस्थित होते. 

लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत असाही विक्रम 
आज राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान पार पडले. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनला करंट येणे, मशीन फोडणे, एक बटण दाबल्यावर दुसऱ्याच्या नावापुढील बझर लागणे, दुबार मतदार, बोगस मतदार अशा विविध कारणांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले. कोल्हापूर परीक्षेत्रातील तीनही महापालिका निवडणुकीत वादावादीचे किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. याचे श्रेय महानिरीक्षक फुलारी यांच्यासह कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, इचलकरंजीचे अपर अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना जाते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.