वडिलांना गांजा ओढायला लागतो म्हणून गव्हाच्या शेतात गांजाची लागवड
सातारा तालुका पोलिसांकडून शेतकरी ताब्यात, 12 लाखांचा गांजा हस्तगत
संभाजी पुरीगोसावी
सातारा : खरा पंचनामा
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका शेतकऱ्याने वडिलांना गांजा ओढायला लागतो म्हणून गव्हाच्या शेतात गांज्याची लागवड केल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी गुरुवारी दुपारी कर्मचाऱ्यासह पाली पो. रोहट (जि. सातारा) येथे गुरुवारी दुपारी धडक छापा टाकला होता. यामध्ये शेतकरी नामदेव लक्ष्मण माने (वय 42 ) याला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमध्ये सुमारे 12 लाख 81 हजार 275 रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.
सातारा तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून कास तलावाच्या पलीकडे पाली या गावात या शेतकऱ्यांने गव्हाच्या शेतात गांजाची लागवड केली होती. दोनच महिन्यांपूर्वी शेतामध्ये गहू पेरला होता. आणि त्याच कालावधीत गव्हाच्या पिकात ठिकठिकाणी लहान-मोठी गांज्याची रोपे लावली होती. अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या वडिलांना गांजा ओढायला लागतो म्हणून लागवड केल्याचे सांगितले. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा लागवड केल्याने याचा हेतू भलताच असावा असेही पोलिसांचे म्हणणे होते. रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलीस ठाणेत या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती अधिक तपास सहायक निरीक्षक सुदर्शन काटकर करीत आहेत.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकांचे सहायक निरीक्षक विनोद नेवसे, सुदर्शन काटकर, सहायक निरीक्षक रूपाली मोरे, धनाजी वायदंडे, मनोज गायकवाड, राजू शिखरे, पंकज ढाणे, दादा स्वामी, सतीश बाबर, प्रदीप मोहिते, मालोजी चव्हाण, किरण जगताप, संदीप पांडव, सुनील भोसले, सचिन इनकार, मोहन नाचण, प्रशांत ताटे, मारुती अडागळे, अमोल निकम यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.