'मराठा-कुणबी' समितीच्या अध्यक्षांची दुसऱ्या राज्यात लोकायुक्तपदी नियुक्ती
मुंबई : खरा पंचनामा
मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी तसेच कार्यपध्दती निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीला आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता न्यायमूर्ती शिंदे यांची अन्य राज्यात लोकायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गोव्याचे नवे लोकायुक्त म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची नेमणूक करण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सांगितले. नव्या लोकायुक्तांच्या नेमणुकीबाबत बुधवारीत मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्यात बैठक झाली होती. या बैठकीनंतर न्या. शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
माजी लोकायुक्त अंबादास जोशी यांचा कार्यकाळ संपल्याने अनेक महिने लोकायुक्त पद रिक्त होते. त्यामुळे लोकायुक्तांसमोर झालेले अनेक प्रकरणे प्रलंबित राहिलेली होती. दरम्यान, या नियुक्तीबाबत गोवा सरकारकडून अद्याप आपल्याला काही अधिकृतपणे कळवण्यात आले नसल्याचे न्या. शिंदे यांनी 'गोमन्तक'ला सांगितले. या शिफारशीला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची मान्यता मिळाल्यानंतर राज्यपालांची मंजुरी घ्यावी लागते. ती प्रक्रिया झाल्यावर कदाचित मला त्याबाबत कळवले जाईल. सध्या मी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात वकिली करत आहे, असे न्या. शिंदे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.