अनुस्कुरा फाट्यावर 1.30 कोटींची गोवा बनावटीची दारू जप्त : राजस्थानच्या एकाला अटक
ट्रकही ताब्यात : राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथक एकची कारवाई
कोल्हापूर : खरा पंचनामा
शाहूवाडी तालुक्यातील राजापुर-मलकापूर रोडवरील अणुस्कुरा फाटा येथे गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. याप्रकरणी राजस्थान येथील एकाला अटक करून ट्रकसह 1.30 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर येथील भरारी पथक एकने ही कारवाई केली.
रामजीवन विरधाराम बिश्नोई (वय 26, रा. S/O: विरधाराम, धनोडा, चाडी, ता. रामसर, बाडमेर, राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक आदर्श आचारसंहिता पार्श्वभूमीवर भरारी पथकाला राजापूर-मलकापूर रोडवरून गोवा बनावटीच्या दारूची एका ट्रकमधून (एम एच 20 इ जी 1310) वाहतूक होणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने गुरुवारी पहाटे अनुस्कुरा परिसरात सापळा रचला होता. माहितीनुसार ट्रक आल्यावर तो अडवण्यात आला.
ट्रकची तपासणी केल्यावर त्यात रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्की गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्याने भरलेले 180 मिलीच्या 1600 बॉक्स (76,800 प्लॅस्टिकच्या सिलबंद बाटल्या) सापडले. यावेळी विदेशी मद्यच्या 1600 बॉक्समध्ये 76,800 सिलबंद बाटल्या (13,824 ब.लि. मद्य) (किंमत 1.15 कोटी), तसेच 15.30 लाखांचा एक ट्रक व एक मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. पथकाने एकूण 1.30 कोटींचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी बिष्णोई याच्याविरुद्ध विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (a), (e), 83, 90,108 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, कोल्हापूरच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, सहायक दुय्यम निरीक्षक कांचन सरगर, जवान विलास पवार, सचिन लोंढे, विशाल भोई, धीरज पांढरे, साजीद मुल्ला यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.