सोलापूरात मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेचा विनयभंग
मुख्याध्यापक फरार : सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संभाजी पुरीगोसावी
सोलापूर : खरा पंचनामा
सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका नामांकित जुन्या शाळेतील मुख्याध्यापकांने शिक्षिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जुलै 2024 ते 19 जानेवारी 2026 या काळात मुख्याध्यापकांने वारंवार सांगूनही छळ सुरूच ठेवला होता. त्याच्या सततच्या त्रासाला वैतागून पीडित शिक्षिकेने अखेर सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेवुन फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल होण्याचा अंदाज येताच मुख्याध्यापक फरार झाला असून सदर बाजार पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
एम. डी. बिराजदार असे त्या संशयित मुख्याध्यापकांचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी ही 13 वर्षापासून त्या शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत होती. त्यांनी दहा वर्ष त्या शाळेत विनाअनुदानित तत्त्वावर काम केले आणि त्यांना आता 40% वेतन मंजूर झाले आहे. त्याच शाळेतील मुख्याध्यापक देखील तेरा वर्षापासून कार्यरत होता. जुलै 2024 मध्ये त्या मुख्याध्यापकांने चुकीच्या व वाईट नजरेतून पाहून अश्लिल हावभाव करायला सुरुवात केली होती. सहा महिन्यांपूर्वी त्याने मोबाईल वरील स्टेटस पतीसोबत ठेवलेला फोटो पाहून तुम्ही खूप छान दिसता, नवऱ्यासोबत फोटो ठेवू नका, साडीवरील एकटीचा फोटो ठेवा अशी टिप्पणी केली होती. त्यावेळी मी मुख्याध्यापकांस वैयक्तिक आयुष्यावर आपण काही बोलू नका असे बजावले होते. त्या नंतरही त्याच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही.
घरी गेल्यावर तो मेसेज, व्हिडिओ कॉल करीत होता. शाळेच्या केबिनमध्ये बोलून हातात हात घेवुन तुम्ही खूप सुंदर दिसता, म्हणून लगट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र घरी गेल्यावर शिक्षिकेची अवस्था पाहून पतीने विचारणा केली. तिने घडलेली घटना पतीला सांगितली. यावेळी पतीने मुख्याध्यापकांस संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही दाद दिली नाही. त्यानंतर शाळेत जावुन त्याने मी नोकरी घालवतो, सेवापुस्तिका खराब करतो अशीही धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल राजगुरू करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.