गोवा बनावटीच्या दारूची तस्करी, साठा करणाऱ्या सांगलीतील तीन तर सोलापुरातील एकाला अटक : 16.15 लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्कची मिरज, सांगोल्यात कारवाई : अधीक्षक पोटे
सांगली : खरा पंचनामा
कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस वेवर मिरजजवळ गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर या तस्कराकडून दारू घेऊन तिचा सांगोल्यात केलेला साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये चारचाकी वाहनासह 16.15 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरज शहर कार्यालयाने ही कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.
सावंता विजय खोत (रा. कोगनोळी ता. कवठेमहांकाळ), आकाश नामदेव खोत (रा. चाबुकस्वारवाडी ता. मिरज), सुनील दादासो खोत (रा. चाबुकस्वारवाडी ता. मिरज), बापू मोहन होवाळ (रा. खेडकर मळा, रोड होवाळ वस्ती शिरभावी, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आहे. एका चारचाकी वाहनातून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिरज कार्यालयाच्या अधिकाऱ्याना मिळाली होती. त्यांनी कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस वेवर सापळा रचला. माहितीनुसार मारुती कार (एम एच १४ जी एस ४२०९) आल्यावर ती अडवून तिची तपासणी केली. त्यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हयातील महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकवून आयात करीत असताना विविध प्रकारचे विदेशी मद्य मिळुन आले. सदर मुददेमालामध्ये गोवा बनावट राज्य निर्मीत विक्री करत असलेले विविध प्रकारचे विदेशी मद्याचा १.४३ लाखांचा मद्यसाठा सापडला. सदर गुन्हयामध्ये तीन मोबाईल व वाहनासह एकूण रुपये 11.78 लाखांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. त्यावेळी सांगली जिल्ह्यातील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये शिरभावी ता. सांगोला जि-सोलापूर येथून गोवा बनावट लेबल येथे मिळतात असे सांगितले.
पथकाने तेथे छापा टाकून तेथे एकूण गोवा बनावट मद्य व रिकाम्या बाटल्या, बुचे असे एकूण ४.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त करून बापू मोहन होवाळ याला अटक करण्यात आली. त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) (एफ) ८०,८१,८३ व ९० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक प्रदीप पोटे, यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेचे निरीक्षक दिपक सुपे, निरीक्षक प्रभात सावंत, पंढरपूरचे निरीक्षक पंकज कुंभार, अजय लोंढे, लक्ष्मण पोवार, जयसिंग खुटावळे, बापू चव्हाण, स्वप्नील अटपाडकर, विनायक खांडेकर, संतोष बिराजदार, कविता सुपने, शाहीन शेख, स्वप्नील कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.