Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या नराधमास 20 वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या नराधमास 20 वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा

सांगली : खरा पंचनामा

अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या नराधमास भा.दं.वि.सं. कलम ३७३-२-एन मध्ये १० वर्षे सक्तमजुरी व दंड ५ हजार रुपये व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद, पोक्सो कायदा कलम ६ नुसार २० वर्षे सक्तमजुरी व दंड १० हजार रुपये व दंड न भरल्यास ४ महिना साधी कैद अशी शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ४  जे. ए. मोहंती यांनी मंगळवारी सुनावली. तसेच पिडीतेवर झाले अत्याचारापोटी तिला भरीव नुकसानभरपाई शासनाकडुन मिळणेबाबत आवश्यक ते निर्देश न्यायनिवाड्यादरम्यान देण्यात आले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता आरती आनंद देशपांडे-सातविलकर यांनी काम पाहिले.

विजय उर्फ यशवंत भुपाल सोनावले (वय १९, रा. हनुमाननगर, गल्ली नं. १, सांगली) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने पिडीत मुलगीच्या मैत्रीणीबरोबर ओळख करुन पिडीतेला आरोपीने स्वतःबरोबर मैत्री करण्यास भाग पाडले. पिडीता ही अल्पवयीन होती. तिच्याशी गोड बोलुन तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगुन तिला मोटरसायकलवर फिरायला घेऊन जाऊन आरोपीने फेब्रुवारी २०१९ मध्ये बापट मळा येथे तिच्याशी बळजबरीने शारीरीक संबंध केले व तुझ्याशी मी लग्न करतो तु घरात कोणाला सांगु नकोस असे सांगितले. त्यामुळे पिडीतेने घरात आपल्या आईला सांगितले नाही.

त्यानंतर दोन महिन्यापासुन पिडीतेला मासिक धर्म न आल्याने आईला शंका आली. त्यावेळी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे पिडीतेला उपचाराकरीता दाखल केले असता पिडीता ही ३ महिन्याची गरोदर असल्याचे समजून आले. त्यावेळी पिडीतेकडे चौकशी केली असता आरोपी विजय उर्फ यशवंत भुपाल सोनवले याने तिच्या जबरदस्ती शारीरिक संबंध करुन गरोदर केल्याचे समजले. त्यामुळे पिडीतेच्या आईने पिडीतेला विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये नेले. पिडीतेने आरोपीविरुध्द विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यामध्ये तपासी अधिकारी म्हणुन उपनिरीक्षक जी. जी. माने व तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर यांनी तपास केला. 

या तपासामध्ये त्यांनी घटनास्थळ पंचनामा, आरोपीचे व पिडीतेचे रक्ताचे नमुने, डी. एन ए सॅम्पल गोळा केले व आरोपीविरुध्द सबळ पुरावा प्राप्त झाल्यानंतर दोषारोपपत्र दाखल केले. सरकारपक्षातर्फे एकुण १३ साक्षीदार तपासण्यात आले. या साक्षींचे कामी पिडीतेची व पिडीतेच्या आईची साक्ष बहुमुल्य ठरली. पिडीतेने दिलेला जबाब व आईचा झालेला जबाब हे एकमेकांना पुरक होते. पिडीतेने आरोपीने केलेला गुन्हा कोर्टात सविस्तरपणे सांगितलेला आहे. त्याचबरोबर तपासी अधिकारी यांनी केलेल्या तपासात पिडीता ही घटनेच्यावेळी अल्पवयीन होती व आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे त्यांच्या तपासात निष्पण्ण झाले. तसेच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे यांच्याकडुन प्राप्त झालेला न्यायवैज्ञानिक अहवाल पाहीला असता पिडीता व आरोपी हेच पिडीतेच्या अर्भकाचे कायदेशीर पालक असल्याचे सिध्द झाले. त्यामुळे पिडीतेच्या जबाबाला पुरक असा न्यायवैज्ञानिक अहवाल होता. या कामातील न्यायवैज्ञानिक श्रीमती नयना चौधरी यांची साक्ष महत्वाची ठरली आहे. सर्व साक्षीपुराव्यांचा विचार करुन न्या. मोहंती यांनी शिक्षा सुनावली.

या खटल्यात विश्रामबाग पोलीस ठाणे येथील इमरान हैदर महालकरी, कविता कुंडलिक निर्मळे तसेच पैरवी कक्षातील उप निरिक्षक अशोक मारूती तूराई, रेखा खोत, सुनिता आवळे, वंदना मिसाळ, सुप्रिया भोसले व कोर्ट ऑर्डरली उप निरिक्षक परीट यांचे सहकार्य लाभले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.