पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी तासगाव ठाण्याचे प्रभारी
सांगली : खरा पंचनामा
सांगली पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाकडील पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची तासगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शनिवारी त्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.
तासगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संग्राम शेवाळे यांची सातारा येथे बदली करण्यात आली आहे. कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी शेवाळे यांच्या बदलीचे आदेश दि. 3 जानेवारी रोजी दिले आहेत. शेवाळे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या तासगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी निरीक्षक सूर्यवंशी यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी ईश्वरपूर तसेच सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.