Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत रिक्षा चोरणाऱ्या कोल्हापूरच्या एकाला अटक सांगली एलसीबीची कारवाई

सांगलीत रिक्षा चोरणाऱ्या कोल्हापूरच्या एकाला अटक 
सांगली एलसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

सांगलीतील टिंबर एरियातून रिक्षा चोरणाऱ्या कोल्हापूर येथील एकाला अटक करण्यात आली. सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

महेश रमेश यादव (वय ४०, सध्या रा. रामकृष्ण परमहंस सोसायटी, डी मार्टचे पाठीमागे, सांगली मूळ रा. साई रेसीडेन्सी, सांगावकर मळा, शिंगणापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगलीतून रिक्षा चोरीला गेल्याची फिर्याद अनिल पालखे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. यातील चोरट्याला पकडण्यासाठी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते.

पथक चोरट्याचा शोध घेत असताना ही चोरी महेश यादव याने केली असून तो चोरीची रिक्षा घेऊन टिंबर एरियात थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. त्याला अटक करून रिक्षा (MH-10-K-3176) जप्त करण्यात आली. त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, अतुल माने, रणजीत जाधव, सुशिल मस्के, श्रीधर बागडी, सुमित सुर्यवंशी, ऋतुराज होळकर, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.