शब्द उधार घेतो, लाव रे तो व्हिडीओ!
मुंबई : खरा पंचनामा
महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त महायुतीची सोमवारी शिवाजी पार्कवर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या सभेवर जोरदार हल्लाबेल केला. ठाकरे बंधूंच्या टीकेला त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून उत्तर दिलं.
राज ठाकरे यांच्याच लाव रे तो व्हिडीओ या वाक्याचा आधार घेत फडणवीस यांनी टोला लगावला. मनसेच्या स्थापनेनंतर आतापर्यंत ठाकरे बंधूंनी एकमेकांवरच केलेल्या आरोपांचे एकत्रित व्हिडीओ फडणवीस यांनी शिवाजी पार्कवर दाखवले.
मी कोणाकडून तरी शब्द उधार घेतो.. लाव रे तो व्हिडीओ असं म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या जुन्या भाषणाचे व्हिडीओ लावले. व्हिडीओनंतर फडणवीस म्हणाले की, कालच्या सभेत जे काही आरोप त्यांनी केले त्याला उत्तर त्यांनीच दिलंय. कालच्या सभेत तेच आवाहन, तीच कारणं, तेच मुद्दे होते. ही मुंबई कोणाच्या बापाच्या बापाच्या बापाच्या बापाच्या बापाच्या बापाच्या बापाचा बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकत नाही.
फडणवीस यांनी म्हटलं की, 'शिवसेनेने मराठी मुलांना फक्त वडापावच्या गाड्या दिल्या. आम्ही त्यांना उद्योग आणि रोजगारही देऊ. उद्योजकांची गुंतवणूक नाकारली तर आपल्याच मुलांना रोजगार मिळणार नाहीत. तरुणांच्या नोकऱ्यांसाठी आम्ही उद्योजकांचे स्वागत करू; मात्र कोणालाही झुकते माप देणार नाही. अटकेपार झेंडे लावणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राकडे कोणीही वाकडी नजर करून पाहू शकत नाही,' असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवाजी पार्कवर युतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत ठाकरे बंधूंवर प्रहार केला.
'काल आदित्य ठाकरे यांनी आपली नक्कल केली; मात्र इतकी वर्षे लोकांच्या नकला करणाऱ्या तुमच्या काकांच्या पक्षाची आज काय अवस्था आहे, ते बघा आणि आता तुमची आणि तुमच्या पक्षाची पढे काय अवस्था होईल, याचाही विचार करा,' असा टोला त्यांनी आदित्य यांना लगावला. विकासावर मला चर्चेचे आव्हान देणाऱ्या आदित्य ठाकरेंसाठी चालविल्याचे पाहून अभिमान वाटेल; पण तुमचे वडील स्वर्गातून खाली बघतील तेव्हा त्यांना आपला मुलगा रशीद मामू यांच्या शेजारी बसलेला दिसेल,' असा तुफानी प्रतिहल्ला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चढविला.
'पंचवीस वर्षे तुमची पालिकेत सत्ता होती तरी मराठी माणूस आज अडचणीत असल्याचे तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही 'चुल्लूभर पानी मे डूब मरो" अशी टीका फडणवीस यांनी केली. सारी कामे अदाणी यांना दिली जात असल्याच्या ठाकरे बंधूंच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला.
काँग्रेस, कम्युनिस्ट, झारखंड मुक्ती मोर्चा, तृणमूल काँग्रेस अशा भाजपेतर पक्षांच्या राज्यांमध्ये अदाणी यांनी केलेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे आकडेही त्यांनी दिले. अदाणींची संपत्ती मोदींमुळे वाढली, हा आरोप खोडून काढताना फडणवीस यांनी टाटा, एचडीएफसी, सन फार्मा, गोदरेज, डी मार्ट, आदित्य बिर्ला, आयसीआयसीआय बँक या सर्वांचा महसूल गेल्या १२ वर्षात तीनशे ते पंधराशे टक्के वाढल्याचा दाखला दिला.
महाराष्ट्रात हिंदीची सक्ती २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या माशेलकर समितीने केल्याचे फडणवीस यांनी दाखवून दिले. नवी मुंबई विमानतळामुळे मुंबई विमानतळ धोक्यात आल्याच्या ठाकरे बंधूंच्या आरोपाबाबत बोलताना, 'राज ठाकरे हे कृष्णकुंजवरून शिवतीर्थावर गेले. उद्धव हे मातोश्री एकवरून मातोश्री दोनवर गेले,' अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली. 'नवी मुंबई विमानतळाची संकल्पना १९८८ मधील होती. मुंबई विमानतळाला मर्यादा आल्याने नवी मुंबई विमानतळ अत्यावश्यक होते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता दीड पट वाढवू,' असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.