देशी बनावटीची पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या साताऱ्याच्या तरुणाला अटक
दोन पिस्तूल, एक काडतूस जप्त : तासगाव पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
तासगाव येथील मणेराजुरी रस्त्यावरील चिंचणी फाटा येथे देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या साताऱ्यातील तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन पिस्तूल, एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली.
सुजल रामचंद्र धनावडे (वय 20, रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तासगावचे नूतन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेकायदा शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पथक अशा गुन्हेगारांचा शोध घेत होते. पथकाला मणेराजुरी रस्त्यावरील चिंचणी फाटा येथे एक तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस सापडले. त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्यांने दोन पिस्तूल मध्यप्रदेश येथील पल्लू सिंग (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. तसेच एक पिस्तूल मेढा येथील घरात ठेवल्याचे सांगितले. त्याला अटक करून दोन पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले.
तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भवड, निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिपक पाटील, अमित परीट, अमर सुर्यवंशी, सुरेश भोसले, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, विवेक यादव, सुरज जगदाळे, निलेश डोंगरे, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, अजय पाटील यांनी ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.