Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणूक हारल्याचा राग, भाजपच्या पराभूत उमेदवाराकडून भाजप कार्यालयावर दगडेफक

निवडणूक हारल्याचा राग, भाजपच्या पराभूत उमेदवाराकडून भाजप कार्यालयावर दगडेफक

धुळे : खरा पंचनामा

धुळ्यासह राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर आज या निवडणुकीचे निकाल हाती येतायत. या निकाला दरम्यान धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळ्यात निवडणूक हारलेल्या एका भाजपच्या उमेदवाराने थेट भाजपच्याच कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यात भाजपच्या दोन महिला नेत्या गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. त्यामुळे या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याच्या प्रभाग क्रमांत 16 या प्रभागातून आकाश शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत आकाश शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आकाश शिंदे यांना ही हार न पचल्यामुळे त्यांनी भाजपच्याच कार्यालयावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. आकाश शिंदे यांच्या समर्थकांनी चाळीसगाव रोज चौफुलीजवळ भाजप कार्यालयावर दगडफेक केली होती. या दगडफेकीत माजी उपमहापौरांसह कल्याणी अंपळकर यांना दाखल करण्यात आली आहे. तसेच या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.