ईडी विरोधात ममता दीदींची तक्रार : दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
कोलकाता : खरा पंचनामा
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या पूर्वी राजकारण तापले आहे. गुरुवारी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कोलकाता येथील राजकीय सल्लागार आणि निवडणूक व्यवस्थापन कंपनी I-PACच्या कार्यालयांवर छापे टाकले. यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला. निवडणुकीपूर्वी ईडीने पॉलिटिकल आणि इलेक्शन मॅनेजमेंट कंपनीवर केलेल्या या कारवाईमुळे तृणमूल काँग्रेस आक्रमक झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घटनास्थळी येऊन आक्रमक भूमिका घेतली. तसेच ही मुद्दाम कागदपत्रांसाठी केलेली कारवाई असल्याचे म्हटले आहे. यावरुन पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलेले असताना ईडीविरुद्ध आता दोन स्वतंत्र FIR दाखल करण्यात आले आहेत.
अनेकदा संपूर्ण देशामध्ये ईडीची कारवाईची चर्चा रंगते. ईडीची छापेमारी हा शब्दप्रयोग आता सर्वसामान्यांसाठी रोजचा झाला आहे. यामधून राजकीय नेते, उद्योगपती या कोणाचीही सुटका झालेली नाही, ईडी थेट कारवाईसाठी ओळखली जात आहे. मात्र पश्चिम बंगालमधील I-PACवर केलेली कारवाई ही अंमलबजावणी संचालनालयाला महागात पडली आहे. ED च्या विरोधात दोन एफआयआर दाखल झाल्या आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. आय-पीएसी प्रमुख प्रतीक जैन यांच्या कुटुंबाने आरोप केला आहे की ईडी अधिकाऱ्यांनी छाप्याच्या नावाखाली त्यांची खाजगी कागदपत्रे चोरली आहेत. ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे की डेटा चोरीला गेला. दरम्यान, टीएमसीनेही छळाचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शेक्सपियर सरानी पोलिस ठाण्यात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) विरोधात वैयक्तिक तक्रार दाखल केली आहे. प्रतीक जैन यांच्या घरी ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, त्यानंतर शेक्सपियर सरानी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ममता यांनी दाखल केलेल्या पहिल्या गुन्ह्यात चोरी, गुन्हेगारी अतिक्रमण आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची चोरीचा आरोप आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.