Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

फडणवीस सरकारचा अध्यादेश भाजपवरच उलटलानगराध्यक्षांच्या दोन मतांनी उपनगराध्यक्षपदाचा गेम फिरला !

फडणवीस सरकारचा अध्यादेश भाजपवरच उलटला
नगराध्यक्षांच्या दोन मतांनी उपनगराध्यक्षपदाचा गेम फिरला !

कणकवली : खरा पंचनामा

कणकवली नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे सुशांत नाईक यांची निवड झाली आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी एक मत सदस्य म्हणून दिले. समसमान मते झाल्याने नगराध्यक्षांनी आपले निर्णायक मत नाईक यांना देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे 10 विरूद्ध 9 अशा फरकाने सुशांत नाईक हे उपनगराध्यक्ष निवडणुकीत विजयी ठरले.

स्वीकृत नगरसेवक म्हणून माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आणि शिंदे शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळू उर्फ सत्यजित पारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कणकवली नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा आज नगरपंचायत सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी संदेश पारकर, मुख्याधिकारी गौरी पाटील तसेच भाजप आणि शहर विकास आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते.

सभेत सर्वप्रथम नवनिर्वाचित सदस्यांचे, नगराध्यक्षांचे स्वागत मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले. यानंतर उपनगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी जाहीर केला. यात उपनगराध्यक्षपदासाठी नाईक आणि राणे या दोहोंचे अर्ज वैध ठरल्याचे त्यांनी जाहीर केले.

त्यानंतर भाजपचे राकेश राणे यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. यावेळी राणे यांना भाजपचे प्रतीक्षा सावंत, सुप्रिया नलावडे, आर्या राणे, मेघा सावंत, मनस्वी ठाणेकर, मेघा गांगण, संजय कामतेकर, स्वप्नील राणे आणि स्वतः उमेदवार राकेश राणे यांनी हात वर करून मतदान केले.

आघाडीचे सुशांत नाईक यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. यात नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह स्वतः सुशांत नाईक, जयेश धुमाळे, संकेत नाईक, दीपिका जाधव, जाई मुरकर, सुमेधा अंधारी, लुकेश कांबळे, रूपेश नार्वेकर यांनी मतदान केले.

उपनगराध्यक्ष निवडणुकीत सुशांत नाईक आणि राकेश राणे यांना प्रत्येकी 9 अशी समसमान मते पडली. त्यानंतर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपल्याला निर्णायक मताचा अधिकार आहे. त्यानुसार आपले निर्णायक मत सुशांत नाईक यांना देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सुशांत नाईक हे उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आल्याची घोषणा पारकर यांनी केली. या निवडीला नगरसेवक संजय कामतेकर आणि नगरसेविका मेघा गांगण यांनी आक्षेप घेतला. नगराध्यक्षांना सदस्य आणि निर्णायक मत देता येते का याबाबत कायदेशीर बाबी स्पष्ट करा अशी मागणी केली.

यावेळी पारकर यांनी उपनगराध्यक्ष निवडीबाबत राज्य शासनाने 26 डिसेंबर रोजी काढलेल्या अध्यादेशाचे वाचन केले. यात नगराध्यक्षांना सदस्य म्हणून मतदान करण्याचा आणि समसमान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार असल्याबाबतचा अधिनियम वाचून दाखवला. उपनगराध्यक्ष निवडीनंतर कणकवली नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी बंडू हर्णे आणि बाळू उर्फ सत्यजित पारकर या दोहोंनी प्रांताधिकारी यांच्याकडे केलेले अर्ज वैध ठरले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.