Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पर्यटनस्थळांवर आता दिसणार नाहीत भटकी कुत्री राज्य सरकारचा निर्णय

पर्यटनस्थळांवर आता दिसणार नाहीत भटकी कुत्री 
राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : खरा पंचनामा

राज्यभरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना घडत असून काही प्रकरणांत नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने आता पर्यटनस्थळांवर भटक्या कुत्र्यांना 'नो एंट्री' देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला आहे.

राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, भटक्या कुत्र्यांचा मोकाट वावर, त्यांच्या हल्ल्यांच्या घटना आणि त्यातून निर्माण होणारी भीती यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळांवर तसेच पर्यटन विभागाच्या अखत्यारीतील निवासस्थाने, विश्रामगृहे आणि त्यांच्या आसपासच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य सरकारने याआधीच सर्व महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींना भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण सक्तीचे करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, केवळ या उपाययोजना पुरेशा ठरत नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. त्यामुळे आता पर्यटन आणि सांस्कृतिक विभागामार्फत थेट पर्यटनस्थळांवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या नव्या निर्णयानुसार, प्रमुख पर्यटन स्थळे, समुद्रकिनारे, किल्ले, धार्मिक स्थळे, पर्यटन निवासस्थाने आणि पर्यटकांची वर्दळ असलेल्या भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने या परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवणे, त्यांचे पुनर्वसन करणे आणि भविष्यात त्यांचा वावर होऊ नये यासाठी नियोजन केले जाणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.