मातृतीर्थ सिंदखेड राजात उसळला जनसागर, वंशजांच्या हस्ते महापूजा
बुलढाणा : खरा पंचनामा
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा ४२८ वा जन्मोत्सव सोहळा सोमवारी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत दर्शनासाठी बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील जिजाऊ व शिवभक्तांचा सकाळपासूनच जनसागर लोटला.
सकाळी ६ वाजता राजे लखुजीराव जाधव राजवाड्यातील राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थानी वंशज राजे शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तसेच केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक राजमाता माँ जिजाऊ यांची महापूजा करुन अभिवादन केले.
यावेळी सिंदखेड राजाचे आमदार मनोज कायंदे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनीही राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सोमवारी सिंदखेड राजा येथील श्री लखुजाराव जाधव राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थळी भेट देवून अभिवादन केले. यावेळी त्यांनी जिजाऊ सृष्टीस भेट दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी संजय खडसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी आदित्य सिंग, तहसीलदार अजित दिवटे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, राज्य संघटक मनोहर तुपकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र चेके, व्यवस्थापक सुभाष कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.