Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील टिळक चौकात मद्यधुंद कार चालकाचे 'हिट अँड रन'चा थरार : दहा ते पंधरा गाड्यांचे नुकसानचार पोलिसांसह 11 जखमी : संतप्त नागरिकांकडून इनोव्हाची तोडफोड, चालकाला बेदम मारहाणपहा व्हिडीओ

सांगलीतील टिळक चौकात मद्यधुंद कार चालकाचे 'हिट अँड रन'चा थरार : दहा ते पंधरा गाड्यांचे नुकसान
चार पोलिसांसह 11 जखमी : संतप्त नागरिकांकडून इनोव्हाची तोडफोड, चालकाला बेदम मारहाण
पहा व्हिडीओ

सांगली : खरा पंचनामा
शहरातील गणपती पेठपासून टिळक चौका पर्यंत एका इनोव्हा कार चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक  नागरिकांना तसेच दहा ते पंधरा वाहनाना जोरदार धडक दिली. यामध्ये दोन वाहतूक पोलिसांसह चार पोलीस तसेच सात नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर संतप्त नागरिकांनी मद्यधुंद कार चालकाला बेदम मारहाण केली तसेच इंनोव्हाचीही मोठया प्रमाणात तोडफोड केली आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमीवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.


सांगलीत कृष्णा नदी काठावर कृष्णामाई उत्सव सुरु आहे. आज अखेरचा दिवस असल्यामुळे नागरिकांनी टिळक चौक, सरकारी घाट परिसरात गर्दी केली आहे. सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक इनोव्हा कार (एम एच 14 एलबी 4900) गणपती पेठेतून टिळक चौकाकडे भरधाव वेगात आली. त्यावेळी दोन वाहतूक पोलिसांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना धडक देऊन कार पुढे गेली.


या भरधाव कारने दहा ते पंधरा वाहनाना धडक दिली. एका दुचाकीला धडक दिल्यानंतर कार थांबली. त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी कार चालकाला ओढून बाहेर काढून बेदम मारहाण केली तर काही नागरिकांनी इनोव्हाच्या काचा फोडून तोडफोड केली. या घटनेत जखमी झालेले वाहतूक पोलीस लखन होवाळे यांनी जखमाकडे दुर्लक्ष करत चालकाला नागरिकांच्या तावडीतून सोडवले. जखमी झालेल्या वाहतूक पोलीस सुभद्रा निरसट या धडक बसल्यावर भोवळ येऊन पडल्या. त्यांना तसेच अन्य जखमीना होवाळे तसेच सांगली शहर पोलीस ठाण्याकडील संदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले. 

याप्रकरणी चालक प्राणिकेत दत्तात्रय पांचाळ (वय 26, रा. कुलस्वामी रोड बार्शी रोड, 5 नंबर स्टॉप, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये जखमी महेंद्र प्रताप पवार (वय 14, रा. जुना बुधगाव रोड सांगली), पूर्वी सुनील फराटे (वय 23, रा. मगरमच्छ कॉलनी, गवळी गल्ली, सांगली), वदन सुनील फराटे (वय 3, रा. सांगली), अनुष्का विनायक फराटे (वय 17, रा. सांगली), अमया माया चव्हाण वय 7, रा. सांगली) महिला पोलीस माया चव्हाण, एलसीबीच्या पोलीस सपना गराडे, वाहतूक पोलीस लखन होवाळे, वाहतूक पोलीस सुभद्रा निसरट, उमा विद्याधर नार्वेकर (वय 50, रा. गावभाग सांगली), स्वप्नील शिवगोंडा पाटील (वय 30, रा. पाटील गल्ली, नदी वेस मिरज) जखमी झाले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.