Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणूक काळात 34 सराईत गुन्हेगारांना 'नो एन्ट्री'मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई

निवडणूक काळात 34 सराईत गुन्हेगारांना 'नो एन्ट्री'
मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 34 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना निवडणूक कालावधीत मिरज तालुक्याच्या हद्दीत प्रवेशास प्रतिबंध (नो एन्ट्री) करण्यात आला आहे. पोलिसांच्या 'नो एन्ट्री'च्या प्रस्तावाला प्रांताधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता  लागू असून, ७ फेब्रुवारी रोजी मतदान व १० फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या कालावधीत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी मिरज ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या आहेत. त्या अंतर्गत मिरज तालुक्यातील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार व उपद्रवी व्यक्तींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आढावा घेऊन, त्यांच्या हालचालींमुळे कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, मिरज ग्रामीण पोलिसांनी त्या 34 जणांना निवडणूक काळात तालुक्यात प्रवेश बंदी करण्याचा प्रस्ताव प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

रणजीत ऊर्फ शरद केरबा ढोबळे (वय ३१, रा. खंडेराजुरी), अतुल पोपट वायदंडे (वय २८, रा. खंडेराजुरी), सुहास सुनिल वायदंडे (वय २१, रा. खंडेराजुरी), आकाश अशोक कांबळे (वय २८, रा. खंडेराजुरी), विशाल मारुती शिंदे (वय २८ रा. आरग), रावजी ऊर्फ रोहित मच्छिद्र नाईक (वय २८ रा. आरग), किरण उमाजी मलमे (वय ३१ रा. एरंडोली), अजित अशोक शेजुळ (वय ३२ रा. मालगाव), सोहेल शाहिद मुजावर (वय २४ रा. मालगाव), अमोल दिनकर चव्हाण (वय ३३ रा. आरग), ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली राजेश ऊर्फ साहेबराव पाटील (वय २६, रा. पाटगाव), प्रविण अनिल मगदुम (वय २६ रा, मालगाव), अक्षय बबन पाटील (वय २५, रा. शिंदेवाडी), विनायक परशुराम मगदुम (वय ३५, रा. मालगाव), राहुल अनिल मगदुम (वय २९ रा. मालगाव), सुशांत सुरेश पाटील (वय ३५ रा. सिध्देवाडी), बाबासाहेब केरबा कोडलकर (वय ३५ रा. मालगाव), अनिस अल्ताफ सौदागर रा. सुभाषनगर), विष्णु गणपती शेजाळ (वय ५२ रा. भोसे), श्रीशैल राम राजमाने (वय २६ रा. सुभाषनगर), समेद शांतीसागर चौगुले (वय २३ रा. सोनी), हर्षल सुकुमार मजगे (रा. एरंडोली) शितल सुरेश दानोळे रा. एरंडोली), सागर हणमंत पाटील (वय २६ रा. सोनी), भानुदास गणेश शिरढोणे (वय ५३, रा. आरग), लक्ष्मण श्रीकांत नाईक (वय ३९ रा. लिंगनुर), अविनाश उत्तम काटकर (वय ३२, रा. रसुलवाडी), सदाशिव रामचंद्र सनदी (वय ३२ रा. सुभाषनगर), चाजीराव उत्तम काटकर (वय २८ रा. रसुलवाडी), अनिल हिंदुराव गुजले (रा. सुभाषनगर), सुखदेव ऊर्फ बंडया हणमंत नाईक (वय २७, रा. रामनगर, खोराडी आरग), शुभम तानाजी पोळ (वय २१, रा. बोलवाड), सागर बाबु नंदीवाले (वय २१, रा. बोलवाड), सागर सोमलिंग मगदुम वय ३५, रा, खटाव), सुरज विठ्ठल नाईक (वय २०, रा, बोलवाड) या 34 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. 

या सर्वांना  ४  ते १० फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत मिरज तालुक्याच्या हद्दीत प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. कारवाई व संबंधीत आरोपीविरुध्द प्रस्ताव तयार करण्याची कामगिरी पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली विकास भोसले, भरत पवार यांनी केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.