चाकूच्या धाकाने अपहरण करून ऑनलाईन पैसे लुटणाऱ्या टोळीतील चौघांना अटक : एक पसार 
एक लाखाचा मुद्देमाल जप्त : अवघ्या चार तासात मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

मिरजेतील कृपामयी हॉस्पिटल ते समतानगर रस्त्यारून मध्यरात्री दूचाकीवरून घरी निघालेल्या व्यक्तीला दुचाकीने धडक देऊन त्याला चाकूचा धाक दाखवत त्याला मारहाण करून त्याचे अपहरण करून त्याचा मोबाईल काढून घेऊन त्यातील गुगल पेद्वारे पैसे काढून घेणाऱ्या टोळीतील चौघांना केवळ चार तासात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक लाखांच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीतील एकजण पसार झाला असून त्याला लवकरच अटक करू अशी माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.

महंमदवाहीद इमाम मुल्ला (रा. माणीकनगर रेल्वे क्याटर्स, मिरज), लतीफ ख्वॉजा शेख (रा. जूना हरीपूर रोड, नूराणी मस्जीदजवळ, मिरज), राजेश चंदू गुजराती (रा. माणीकनगर, जनवाडे प्लॉट, मिरज), राहील राजू शेख (रा. समतानगर, गल्ली नं. ०१, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अविनाश ऊर्फ रितेश शिवाजी कुरणे (रा. माणीकनगर, जनवाडे प्लॉट, मिरज) असे पसार झालेल्याचे नाव आहे. राजीव मार्टीन देवासीया (रा. चौगुले प्लॉट, जनवाडे मळा, समतानगर, मिरज) हे बुधवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून कृपामयी ते समतानगर रस्त्याने जात होते. त्यावेळी संशयित तिघे दुचाकीवरून आले. त्यांनी देवासिया यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना थांबवले. त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांचे अपहरण करून बामणी येथील नदी काठावर नेले. तेथे मारहाण करून त्यांचा मोबाईल काढून घेतला. त्यातील गुगल पेद्वारे 18 हजार रुपये जबरदस्तीने तिसऱ्या व्यक्तीच्या खात्यावर पाठवून त्यांची फसवणूक केली. याबाबत त्यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानंतर सहायक निरीक्षक शिंदे यांनी तांत्रिक माहिती काढत या गुन्ह्यातील संशयितांची नावे निष्पन्न केली. त्यानंतर त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव, अभिजीत धनगर, सचिन कुंभार, नानासाहेब चंदनशिवे, बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, मोहसिन टिनमेकर, अमोल तोडकर, राजेंद्र हारगे, देवानंद नागरगोजे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.