अजित दादांच्या विमान अपघाताचा अहवाल आला, 5 धक्कादायक गोष्टी समोर
मुंबई : खरा पंचनामा
अजित पवार यांच्या विमान आधी झाडावर कोसळले आणि नंतर जमिनीवर आदळले अशी माहिती या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे.
विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाला, मात्र रॉ डेटा रेकॉर्ड करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी दृष्यमानता 2000 मीटर इतकी होती, तसेच दोन्ही पायलटला बारामती विमानतळावर विमान लॅन्ड करण्याचा अनुभव होता.
विमान अपघाताच्या काही सेकंद आधी वैमानिकांचे संभाषण देखील समोर आहे. पायलटने शेवटी मेडे मेडे म्हणण्याऐवजी ओह शिट असं म्हटल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे.
हा अपघात एकाच कारणामुळे नव्हे, तर हवामान + पायाभूत सुविधा + ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडल्याची शक्यता आहे. अंतिम कारणे CVR/FDR सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होतील असंही या प्राथमिक अहवालातून समोर आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.