"अपघातात 6 जणांचा मृत्यू, मग प्रत्यक्षात."
विमान अपघाताविषयी मिटकरींच्या 5 प्रश्नांनी खळबळ !
मुंबई : खरा पंचनामा
अजित पवार यांच्या अकाली निधानानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुःखातून सावरण्यासाठी अजून काही वेळ लागणार आहे.
यातच काल शनिवारी ३१ जानेवारी या दिवशी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मात्र, अजूनही अजितदादांच्या दुःखातून अनेक नेते सावरलेले नाहीत. यातच अजित पवार यांच्या एका जवळच्या नेत्यांनी एक्सवरून पोस्ट शेअर करत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत ५ प्रश्न उपस्थित केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. असे अमोल मिटकरींनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यासोबत त्यांनी आपल्या मनातील शंका उपस्थित केली आहे.
काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्छा बघून परत डोळे पाणावले त्यातील पहिली खुर्ची - सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची. आणि दुसरी - आदरणीय दादांची!! मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले.
गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही. मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? असे सहा प्रश्न अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी विचारले आहेत. प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही, असे देखील त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, अमोल मिटकरी यांनी यानंतर काही वेळातच दुसरी एक दुसरी एक पोस्ट एक्सवरून केली असून यामध्ये त्यांनी विमान निवड आणि पायलटविषयी सवाल उपस्थित केले आहेत. उपमुख्यमंत्रीसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? असा सवाल मिटकरींनी विचारला आहे.
तसेच अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल-संबंधित कारणांवर शासकीय कारवाई/निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल-फिटनेस, CRM व सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली. याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय? असा थेट सवाल अमोल मिटकरींनी विचारला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.