Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भुईंज पोलिसांकडून 6 लाख 70 हजार रूपयांचे मोबाईल मूळ मालकांना परतभुईंज पोलिसांची दमदार कामगिरी

भुईंज पोलिसांकडून 6 लाख 70 हजार रूपयांचे मोबाईल मूळ मालकांना परत
भुईंज पोलिसांची दमदार कामगिरी 

सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी 
सातारा : खरा पंचनामा

भुईंज पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये नागरिकांचे गहाळ झालेले 6.70 लाखांचे एकूण 30 मोबाईल हस्तगत करण्यात भुईंज पोलिसांना यश मिळाले आहे. 

भुईंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये पाचवड, भुईंज अशी मुख्य बाजारपेठ असून आजूबाजूच्या गावातुन हजारोंच्या संख्येने लोक खरेदी, विक्री करिता येत-जात असतात. प्रवासादरम्यान तसेच इतर ठिकाणी त्यांचे मोबाईल फोन गहाळ होण्याचे प्रमाण अधिक वाढले होते. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे यांनी पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेणे करिता पोलीस ठाणेकडील डीबी पथकास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डी.बी. पथकांतील आकाश कुंभार, सागर मोहिते यांनी सी.ई.आय.आर. पोर्टल व इतर तांत्रिक माहिंतीच्या आधारे महाराष्ट्रांसह इतर राज्यांतून गहाळ झालेले मोबाईल फोन वापरत असलेल्या मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करून शिताफीने ही सदरची मोहीम राबवून भुईंज पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले 6. 70 लाखांचे एकूण 30 स्मार्ट फोन हस्तगत केले.

यामध्ये एक आयफोन-14 प्रो-मॅक्स हा महागडा मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे. यापुढे अशाच प्रकारची गहाळ झालेले मोबाईल फोन शोधण्याची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे यांनी सांगितले आहे. 

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पृथ्वीराज ताटे, उपनिरीक्षक पतंग पाटील, सुरेश शिंदे, टकले, नितीन जाधव, कोलवडकर, वाघमोडे, रमेश बरके, बल्लाळ, निंबाळकर आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. भुईज पोलिसांच्या या कामगिरीबद्दल जनतेंतून विशेष कौतुक होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.