Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नवनिर्वाचित मराठा महापालिका नगरसेवकांचा सत्कार होणारसोलापूर जिल्हा सकल मराठा समाज विश्वस्तांची बैठक : राजा माने यांची माहिती

नवनिर्वाचित मराठा महापालिका नगरसेवकांचा सत्कार होणार
सोलापूर जिल्हा सकल मराठा समाज विश्वस्तांची बैठक : राजा माने यांची माहिती

सोलापूर : खरा पंचनामा

सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाच्या विश्वस्त मंडळाची बैठक  सोलापूर येथील मयूरबन हॉटेल येथे पार पडली. या बैठकीत मराठा समाज विकास व प्रबोधन विषयक विविध उपक्रमांची चर्चा झाली. नुकत्याच झालेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या मराठा समाजाच्या नगरसेवकांचा सत्कार करण्यासाठी विशेष सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्याध्यक्ष राजा माने यांनी दिली.

विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माऊली पवार व शारदभाऊ ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीस ॲड. गणेश देशमुख, श्रीमती नलिनीताई जगताप, किसनराव दाडगे, निळकंठ वाघचौरे, दत्तामामा मुळे, राजू सुपाते हे विश्वस्त उपस्थित होते. सौ. उत्तरा बचूटे- बरडे या विश्वस्त बैठकीत ऑनलाईन सहभागी झाल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.