Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस व्हॅन सजली, वऱ्हाड निघालं लग्नाला!

पोलीस व्हॅन सजली, वऱ्हाड निघालं लग्नाला!

पिंपरी चिंचवड : खरा पंचनामा

सरकारी वाहनांचा वापर केवळ शासकीय कामासाठीच करणे बंधनकारक असताना, पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क शासकीय गाडीतून लग्नाचे वऱ्हाड नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपळे सौदागर परिसरात हे दृश्य पाहून नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळे सौदागर परिसरात पोलिसांचे शासकीय वाहन लग्नाच्या वऱ्हाड्यांनी भरलेले दिसून आले. फुलांनी सजवलेली पोलिसांची ही शासकीय गाडी पाहून स्थानिक नागरिकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्ये कैद केली. या प्रकरामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

सामान्य जनतेच्या करातून जमा झालेल्या पैशातून मिळणाऱ्या शासकीय सोयी-सुविधांचा असा खाजगी आणि कौटुंबिक कार्यासाठी वापर करणे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शासकीय वाहनांचा वैयक्तिक कारणांसाठी वापर करण्यास मनाई असताना हा नियम कोणी धाब्यावर बसवला ? संबंधित वाहन पोलिसांच्या कोणत्या विभागाचे आहे आणि त्यावेळेस कोणाच्या ताब्यात होते ? या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जाणार का ? या घटनेमुळे प्रशासकीय शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.