Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चक्क धाब्यावर सापडली ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन!

चक्क धाब्यावर सापडली ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन!

सोलापूर : खरा पंचनामा

मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटातील अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुरुल जिल्हा परिषद गटातील दोन मतदान मशीन व व्हीव्हीपॅट मशीन शनिवारी (दि. 7) रात्री 11 च्या दरम्यान शहरानजीक पुणे रस्त्यावर असलेल्या एका धाब्याजवळ आढळून आले.

या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या संशयास्पद कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद पाटील यांनी आपली चूक झाल्याचे कबूल केले.

धाब्याजवळ आढळून आलेल्या मतदान मशीन व व्हीव्हीपॅट मशीनची माहिती मिळताच जिल्हा परिषद गटाचे उमेदवार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी व एस. पी. घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत मतदान पेट्या हलवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. या सर्व प्रकारामुळे परिसरात प्रचंड मोठा गोंधळ उडाला असून परिसरातील नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर, नायब तहसीलदार अनिल शहापुरे, नायब तहसीलदार सुधाकर धाईजे यांच्यासह निवडणुकीची पूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी नरखेड व कुरुल जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही सुरू होती.

याविषयी बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद पाटील यांनी आपली चूक झाल्याचे कबूल केले. ते म्हणाले की, माझ्याकडून चूक झाली हे मला मान्य आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन वातावरण चांगलेच तापले असून यावर पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.