"जो हिंदू आहे, तोच बनेल सरसंघचालक SC, ST समाजीतील असला तरी बनू शकतो"
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष मुंबईमध्ये साजरे होत आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईच्या वरळी येथील नेहरु सेंटर सभागृहात 'संघाचा 100 वर्षांचा प्रवास नवी क्षितिजे' या विषयावर व्याख्यानसत्र पार पडले.
या सत्रात आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोहन भागवत यांनी त्यांच्या निवृत्तीबद्दल बोलतानाच आरएसएसचे प्रमुख कोण होऊ शकतात? याबाबत एक महत्त्वाचे विधान केले.
"संघाच्या क्षेत्राचे, जिल्ह्यांचे आणि विभागांचे संघचालक याची तीन वर्षातून एकदा निवडणूक होते. यांना निवड करणारा तो सुद्धा स्वयंसेवकांकडून निवडला जातो. 50 स्वयंसेवकांमागे 1 असे प्रांत प्रतिनिधी असतात. 40 प्रांत प्रतिनिधीमागे 1 अखिल भारतीय प्रतिनिधी असतो. अखिल भारतीय प्रतिनिधी सरकार्यवाहक आणि क्षेत्र संघचालकांची निवड करतात. त्यांच्यासोबत प्रांतनिधी हे प्रांत, जिल्हा संघचालकांची निवड करतात," असं मोहन भागवत म्हणाले.
"माझी ७५ वर्ष पूर्ण झाली मी कार्यकर्त्यांना विचारले माझी ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यावेळी कार्यकर्ते म्हणाले काय अडचण आहे? मी इथे बसने हे माझ्या हातात नाही आणि इथून जाणे हे देखील माझ्या हातात नाही. संघाच्या हातात आहे. आतापर्यंत कुणाला निवृत्त करण्याची वेळ आली आहे. संघाचा सरसंघचालक कोण बनावे? कोणी ब्राह्मण संघाचा सरसंघचालक बनू शकत नाही. क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनू शकत नाही. जो हिंदू आहे, तोच बनेल. सरसंघचालक SC, ST समाजीतील असला तरी बनू शकतो. आणखी कोणी असेल तरी बनू शकतो. असं काही पाहून आमच्याकडे कार्यकर्त्यांची नियुक्ती होत नाही. जो काम करेल तो होऊ शकतो," असंही मोहन भागवत यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.