विधान परिषद समितीकडून कुणाल कामरा, सुषमा अंधारेना समन्स
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र विधान परिषदेच्या हक्कभंग समितीने स्टैंड-अप कॉमेडियन कुणाल कामरा आणि ठाकरेसेना नेत्या सुषमा अंधारे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या कथित अपमानजनक टिप्पणीबद्दल सुनावणीसाठी बोलावले आहे.
हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले की, कामरा आणि अंधारे यांना १५ दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्यांना गुरुवारी दुपारी २ वाजता समितीसमोर सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले. दोन समन्सनंतरही ते हजर न झाल्यास, समिती त्यांच्यावर कारवाईबाबत निर्णय घेईल.
भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शिंदे यांच्यावरती अपमानजनक टिप्पणी केल्याबद्दल कामरा आणि अंधारे यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दाखल केली होती. ठाकरेसेना पक्षाच्या नेत्या अंधारे यांनी कामराला पाठिंबा दिला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.