मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प का झाली?
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
पुणे : खरा पंचनामा
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी आडोशी बोगद्याजवळ प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. मुंबई-पुणे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला.
3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता हा टँकर उलटला होता. मात्र 24 उलटूनही वाहने जागच्या जागी थांबली. महामार्गावर वाहतूक कोंडी असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा. मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प का झाली? याबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता एक गॅस टँकर उलटला.
हा टँकर उलटल्यावर त्यातून वायूगळती सुरु झाली.
महामार्ग पोलिस, स्थानिक प्रशासनाची सुमारे 40 जणांची टीम लगेचच घटनास्थळी पोहोचली.
उलटलेल्या गँकरमधील गळती बंद करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला. पण, त्यात प्रॉपेलिन हे अत्यंत ज्वलनशील रसायन असल्याचे कळताच संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली.
छोटाही स्पार्क मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणारा होता.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पाहणी केल्यावर कुठलीही घाई करुन चालणार नाही, हे समजले. लगोलग राज्य सरकारला सतर्क करण्यात आले.
राज्य सरकारने लगेचच बीपीसीएल आणि एनडीआरएफ यांना पाचारण केले.
या दोन्ही यंत्रणा तेथे पोहोचून, आज पहाटे 4.30 वाजतापासून एनडीआरएफ आणि बीपीसीएल यांनी परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली.
आतापर्यंत दोन व्हॉल्व्ह बंद करण्यात यश आले असून, एका ठिकाणाहून लीकेज सुरु आहे. रिकामे टँकर आणून त्यात हे रसायन हस्तांतरित करण्याचे काम सुरु करण्यात आले.
एक टँकर भरून झाल्यावर, आता दुसऱ्या टँकरमध्ये ते हस्तांतरित करण्यात येत आहे. प्रोपेलिनसारखे घातक रसायन असलेल्या टँकरची ही अशाप्रकारची पहिलीच घटना असल्याचे समजते.
या वाहतूक कोंडीमुळे सामान्यांना झालेला त्रास आणि एकूणच भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करुन शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.