मंत्र्यांची मोघम उत्तरे, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर संतापले
मुंबई : खरा पंचनामा
राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (ता. 25 फेब्रुवारी) विधानसभेत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कामकाजाला सुरुवात झाली. मात्र, या प्रश्नोत्तराच्या तासांत मंत्री भरत गोगावले आणि मंत्री अशोक उईके यांच्या उत्तरावर खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आक्षेप घेतला.
मंत्र्यांनी मोघम उत्तरे देऊ नये. त्यांच्याकडून ठोस उत्तरे किंवा एखाद्या कालावधीपर्यंतचे उत्तर देण्यात यावे, अशा सूचना यावेळी नार्वेकरांकडून करण्यात आल्या. तर, काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही मंत्र्यांना घेरले. सरकार म्हणून थोडी तरी जनाची नाही पण मनाची लाज बाळगा, असे म्हणत वडेट्टीवारांनी मंत्र्यांवर टीकास्त्र डागले. तर, पहिल्या प्रश्नाच्यावेळी मंत्री भरत गोगावले यांनाही आमदारांनी ठोस उत्तरे मिळत नसल्याने घेरल्याचे पाहायला मिळाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.