Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"अजितदादांचा विमान अपघात हा घातपात?" रोहित पवारांचा थेट FIR दाखल करण्याचा इशारा

"अजितदादांचा विमान अपघात हा घातपात?" 
रोहित पवारांचा थेट FIR दाखल करण्याचा इशारा

मुंबई : खरा पंचनामा 

राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या मुद्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएने तातडीने आपल्या अहवालात व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीला क्लिनचीट देण्याचा प्रयत्न झाला असल्याचे पवार यांनी सांगितले. आपण या प्रकरणी आता एफआयआर दाखल करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात आक्रमक होण्याचे संकेत आज रोहित पवार यांनी दिले. आगामी ४८ तासात विमान अपघात प्रकरणात आणखी मोठी माहिती उघड करणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.

अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात DGCA कडून पहिली कारवाई करण्यात आली आहे. DGCA ने VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या विमान कंपनीच्या उड्डाणांवर बंदी आणली आहे. DGCA या प्रकरणी ऑडिट केलं आहे. यामध्ये VSR व्हेंचरच्या सर्व लिअरजेट विमानांच्या उड्डाणांवर आता बंदी आणली. त्यानंतर आज राज्याच्या विधीमंडळाच्या आवारात माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी नवीन खळबळजनक आरोप केले.

रोहित पवार यांनी सांगितले की, अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला त्याच दिवशी २८ जानेवारी रोजीच व्हीएसआर कंपनीला क्लिनचीट देण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीजीसीएच्या पहिल्या अहवालात हा प्रयत्न करण्यात आला होता, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

डीजीसीएने व्हीसीआर कंपनीची विमानाची सेवा थांबवली. हवाई योग्यता, हवाई सुरक्षा आणि उड्डाण ऑपरेशन्सच्या क्षेत्रात अनेक त्रुटी आढळून आल्या. विमान देखभालीच्या मुद्यावर लिअरजेटची पाच विमाने ग्राउंड करण्यात आली आहे. काल सेवा खंडित केली असली तरी त्यात एक पळवाट सोडली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. विमानाची देखभाल, विमानाची मेंटन्स पूर्ववत केल्यानंतर पुन्हा विमान सेवा सुरू करण्याची मुभा दिली गेली असल्याचे त्यांनी म्हटले.

डीजीसीएने फक्त कारवाईचा देखावा केला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. नागरी उड्डयन मंत्र्याच्या पक्षाच्या नेत्याचे आणि व्हीएसआरच्या मालकाचे हितसंबंध आहेत. त्यामुळे टीडीपीच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली. पाच विमाने ग्राउंड केली असली तरी मेटेन्स आणि इतर प्रमाणपत्रे ही डीजीसीए देते. व्हीएसआरला विमान योग्य असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. व्हीएसआरच्या मालकाला ताब्यात घेऊन कारवाई करायला हवी. डीसीजीएच्या अधिकाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

रोहित पवार यांनी सांगितले की, मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी जाणार आहे. घातपाताच्या मुद्यावर तक्रार नोंदवणार आहे. व्हीएसआर, डीजीसीएच्या अधिकाऱ्यावर आणि इतर जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात जाणार असल्याचे सांगितले. मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआरची नोंद न झाल्यास आपण बारामतीमध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआरसाठी ठिय्या देणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.