मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात राडा !
रोहित पवार-अमोल मिटकरी भिडले, पोलिसांशी जोरदार शाब्दिक चकमक
मुंबई : खरा पंचनामा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. आमदार रोहित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला असून, पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. यावेळी पोलीस आणि नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
रोहित पवार यांनी पोलिसांना धारेवर धरत विचारले की, "राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू होतो, आमच्याकडे या प्रकरणात घातपाताचे स्पष्ट पुरावे आहेत, तरीही पोलीस अद्याप एफआयआर (FIR) का दाखल करत नाहीत?" विमान कंपनीला वाचवण्यासाठी पोलीस दबावखाली काम करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
आमदार अमोल मिटकरी यांनीही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "एवढ्या मोठ्या नेत्याचा जीव जातो आणि पोलीस केवळ चौकशीचे नाव सांगून वेळकाढूपणा करत आहेत," असे मिटकरी म्हणाले. आंदोलनाची तीव्रता पाहता पोलीस उपायुक्त (DCP) प्रवीण मुंढे तातडीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी रोहित पवार आणि उपायुक्त मुंढे यांच्यात जोरदार वादावादी झाली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.