Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अपघात की कट? सीआयडीची पहिली अधिकृत भूमिका स्पष्ट

अपघात की कट? सीआयडीची पहिली अधिकृत भूमिका स्पष्ट

पुणे : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत भीषण विमान अपघात झाला आहे. या अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. आता या प्रकरणाला एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे.

२८ जानेवारी रोजी झालेल्या या दुर्घटनेबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) आपली पहिली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. हा केवळ अपघात होता की त्यामागे एखादा सुनियोजित कट (घातपात) होता, या दोन्ही शक्यतांची अत्यंत सखोल चौकशी सुरू आहे, असे सीआयडीने म्हटले आहे. या निवेदनामुळे अजित पवारांच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढले आहे. आता या तपासात नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी काल एक विशेष पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास कसा सुरु आहे, आतापर्यंत या तपासात काय काय समोर आले, या तपासाची सद्यस्थिती काय, याबद्दलची माहिती दिली. आम्ही या प्रकरणातील तांत्रिक आणि मानवी अशा दोन्ही बाजू तपासत आहोत. जर तपासादरम्यान यामध्ये कोणताही गुन्हेगारी कट, खून किंवा जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा आढळून आला, तर सीआयडी तात्काळ औपचारिक एफआयआर (FIR) दाखल करु. तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सुनील रामानंद म्हणाले.

सीआयडीने दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताचा तांत्रिक तपास करणाऱ्या 'एअरक्राफ्ट अक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' (AAIB) चा सविस्तर अहवाल अद्याप मिळालेला नाही. हा अहवाल तपासासाठी फारच महत्त्वाचा असणार आहे. या विमानाचा ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला आहे. सध्या त्यातील डेटाचे सखोल विश्लेषण सुरू आहे. अजित पवारांच्या विमानाने किती वाजता उड्डाण घेतले, त्यांच्या उड्डाणावेळी वैमानिकाचे संभाषण आणि विमानाची तांत्रिक स्थिती काय होती, हे यातून स्पष्ट होईल, असे सीआयडीने म्हटले आहे.

या तपासात अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय यंत्रणा सहभागी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरील डेटा एकत्र केला जात आहे. त्यामुळे त्याचे विश्लेषण करण्यास वेळ लागत आहे, असे सीआयडीने स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.