Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मिरजेच्या बंटी आणि बबलीला अटक विश्रामबाग पोलिसांची गोव्यात कारवाई

लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या मिरजेच्या बंटी आणि बबलीला अटक 
विश्रामबाग पोलिसांची गोव्यात कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

शहरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक मासाळे यांची जमीन विकसित करण्यासाठी 36.60 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या तसेच अन्य गुन्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून पसार असलेल्या मिरजेतील बंटी आणि बबलीला गोव्यातील शिवोली येथून अटक करण्यात आल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.

इब्राहीम महंमदसाब नायकवडी (इनामदार) (वय ५१), जास्मिन इब्राहीम नायकवडी (इनामदार) (वय ४१, दोन्ही रा. गुरुवार पेठ, छलवादी गल्ली, मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. इब्राहीम आणि जास्मिन इब्राहीम नायकवडी (इनामदार) यांनी अशोक मासाळे यांना जमीन विकसित करण्यासाठी करारतत्वावर देतो असे सांगून त्यांचेकडून तसे करारपत्र करून घेऊन फिर्यादी यांचेकडून त्या मोबदल्यात सुमारे ३६ लाख ६० हजार १०० रूपये इतकी रक्कम घेऊन ती परत न देता फिर्यादी यांना शिवीगाळी करून फिर्यादी यांची फसवणूक केलेली आहे. याबाबत दि. 4 मार्च 2025 रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून ते आजतागायत नायकवडी दांम्पत्य हे आपली ओळख लपवून फिरत होते. 

अन्य गुन्ह्यातही हे दाम्पत्य मागील तीन ते चार वर्षांपासून पसार होते. त्यांचा शोध सुरू होता. विश्रामबागचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पौवार, सुनिल पाटील यांनी पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे गोपनीय बातमीदार यांचे मार्फतीने तसेच तसेच आरोपीत यांचे वास्तव्याबाबत तांत्रिक पुरावा प्राप्त करून आरोपी यांचा शिवोली गोवा परीसरात शोध घेतला असता इब्राहीम नाईकवडी व जास्मीन नाईकवडी हे आपले अस्तित्व लपवून राहत असलेबाबत आढळून आल्यानंतर व त्यांचेविषयी माहीती मिळून आल्यानंतर त्यांना अंजूना पोलीस ठाणे उत्तर गोवा येथे कायदेशीर ताब्यात घेऊन व अटक करण्यात आली.

विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील पोवार, ग्रेड उपनिरीक्षक निवास कांबळे, शुभांगी मुळीक, सुनिल पाटील, महंमद मुलाणी, काजल चव्हाण, सायबर पोलीस ठाणेकडील अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मिरजेतही गुन्हे दाखल 
नायकवडी दांपत्यावर यापुर्वी मिरज शहर पोलीस ठाणे गु रजि नं ३९१/२०२२ भा देदं वि सं कलम ४२० व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ कलम ०३ प्रमाणे तसेच मिरज शहर पोलीस ठाणे गु रजि नं ११६/२०२५ अनुसुचीत जाती जमाती प्रतिबंध अधिनियम १९८९ प्रमाणे दाखल आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.