Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवारांचा अपघात धुक्यामुळे की धोक्यामुळे?

अजित पवारांचा अपघात धुक्यामुळे की धोक्यामुळे?

मुंबई : खरा पंचनामा 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावरुन रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी रोहित पवार भूमिका मांडत आहेत, मात्र याप्रकरणाची एफआयआरही नोंदवली जात नसल्याने रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला.

याचप्रकरणी आज रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. शिवतीर्थ या निवासस्थानी दोघांमध्ये १ तास चर्चा झाली. या भेटीनंतर राज ठाकरेंनीही अजित पवार यांच्या अपघातावरुन सरकारला सवाल विचारला आहे.

"मी याआधीही बोललो होतो की अपघात धुक्याने झालं की धोक्याने झाला. रोहित पवार यांचा एफआयआर लिहून घेतला जात नाही, हे गंभीर आहे. मुंबईमध्ये पोलीस एफआयआर लिहून घेत होते, मात्र त्याठिकाणी डीसीपी आले आणि त्यांनी सांगितलं एफआयआर लिहायचं नाही असे सांगितले. हे कशासाठी सुरु आहे? तो निव्वळ अपघात असेल, मात्र घरच्यांना चौकशी करायची असेल तर सरकारकडून अडथळे का आणले जात आहेत? सुनेत्रा वहिनी आज बसल्या आहेत, त्यांनी याकडे लक्ष द्यावं, कारण अजित पवार त्यांचेच पती होते. त्यांच्याच पतीच्या अपघाताबद्दल हा एपआयआर होता. आणि त्याला सरकारकडून दबाव येत आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

"राज्यात कोणीही कुठेही एफआयआर नोंदवू शकतो. मात्र एफआयआर नोंदवायला गेलेल्या माणसाला जर अडथळे आणले जात असतील तर त्यामागे काही काळंबेरं आहे का? असा संशय निर्माण होत आहे. सरकारचं याबाबत संशय निर्माण करत आहे. सरकारने या गोष्टींची उत्तरे दिली पाहिजेत. सरकार संशयाची भूतं नाचवंत आहे. यामागे काय राजकारण आहे मला माहित नाही. मात्र एफआयआर नोंदवू नये म्हणून सरकार का प्रयत्न करत आहे, याची उत्तरे द्यावीत, अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.

तसेच पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "तीन तीन ठिकाणी प्रयत्न करुनही एफआयआर नोंदवला जात नसेल. पोलीस स्टेशनवर जर दबाव टाकला जात असेल तर हे कशासाठी? इतका दुर्दैवी अपघात कुणाचाच होऊ नये. मात्र याची नीट चौकशी होत नसेल तर भलत्याच दिशेला हा महाराष्ट्र घेऊन जात आहोत. राष्ट्रवादीच्या खासदारानी अधिवेशनातही हा मुद्दा मांडावा. अजित पवार यांच्यासारख्या व्यक्तीचा एफआयआर नोंदवला जात नसेल तर यामागे काय काळंबेरं आहे, हे सरकारला सांगावं लागेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.