दोन IAS अधिकाऱ्याना सस्पेंड करण्याचे विधीमंडळातून आदेश, फाईल मुख्यमंत्र्यांकडे !
मुंबई : खरा पंचनामा
अर्थसंकल्पीय अधिवेशनातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. वरिष्ठ दोन IAS अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याचे आदेश तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी गुरुवारी दिले होते. त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून निलंबनाची फाईल्स पर्यावरण विभागाने मुख्यमंत्र्याकडे दिली असल्याची माहिती आहे. IAS अधिकारी एम देवेंद्र सिंग, सतीश पडवळ यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्याकडे या संदर्भातील फाईल्स पर्यावरण विभागाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 'चंद्रपूरमधील आमदारानी पर्यावरणासंदर्भात सभागृहात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला होता. त्याला त्यांना उत्तर देता आले नाही. मुंडे यांनी सभागृहात सांगितले की, अधिकाऱ्यांना याबाबत सांगितले होते. मात्र, त्यांनी ब्रिफींग दिले नाही. त्यांना वारंवार बोलवून देखील ते उपस्थित राहिले नाहीत.'
तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी यांची गंभीर देखली देत तत्काळ संबंधित अधिकाऱ्याला निलंबीत करण्याचे करा आदेश दिले होते. त्यामुळे आज प्रदुषण नियंत्रण मंडळातील सदस्य, सचिव असलेले IAS अधिकारी एम देवेंद्र सिंग त्यांना निलिंबीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पर्यावरण विभागाने निलंबीत करण्याची फाईल मुख्यमंत्र्याकडे दिली आहे. सहसंचालक सतीश पडवळ यांना देखील निलंबीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी निलंबनाच्या आदेशा विष बोलताना यी सांगितले की, अधिकारी माहिती देत नसतील, सहकार्य करत नसतील तर तो सभागृहातील सर्व आमदारांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. अधिकारी हा किती मोठा असला तरी त्याला त्याची जबाबादरी दाखवून देणे हे आमचं काम आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.