Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजितदादांचा घातपात की अपघात ? राज ठाकरे यांनी रोहित पवारांना दिला तो शब्द!

अजितदादांचा घातपात की अपघात ? राज ठाकरे यांनी रोहित पवारांना दिला तो शब्द!

मुंबई : खरा पंचनामा 

आमदार रोहित पवार यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. अजितदादांचा विमान अपघात की घातपात या मुद्दावर त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा झाली. या दरम्यान रोहित पवार यांच्याकडून राज ठाकरे यांनी विमान अपघाताची माहिती घेतली. राज ठाकरे यांनी यावेळी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की, पोलिसांनी FIR को नोंदवून घेतला नाही. त्यांनी एकच प्रश्न केला की राज्यातील एका मोठ्या नेत्याचा अपघाती मृत्यू झाला आहे, त्याचा एफआयआर नोंदवला जात नाही हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

राज ठाकरे यांच्या भेटीसाठी रोहित पवार यांनी वेळ मागितला. त्यांनी अमित ठाकरे यांच्याशी बोलणे करून ही वेळ घेतली. अजितदादांच्या विमान अपघाताविषयी बोलायचं असल्याचे सांगितल्यावर राज ठाकरे यांनी लागलीच वेळ दिल्याचे रोहित पवार म्हणाले. आज इथे आल्यावर बराच वेळ त्यांनी सर्व घटना समजून घेतल्या. जी माहिती घेऊन गेलो. ती त्यांनी समजून घेतली. त्यांनी सांगितलं की, सर्वात महत्त्वाचा प्रश्न एवढाच आहे की एफआयआर पोलिसांनी का घेतला नाही. त्यांचा अभ्यास चांगला असल्याने त्यांनी मला सर्वोच्च न्यायालयाचे दोन दाखले दिले, असे रोहित पवार यांनी सांगितले.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, दादांना ओळखत होतो. आम्ही एकत्र काम केलं. दादा असो का आणि इतर काय मराठी माणसासाठी जे करायचं ते आम्ही करू. राज ठाकरे मराठी माणसासाठी लढत आले आहेत. राज ठाकरे या विषयाला न्याय देणार आहेत. राज्यातील जनता दादाला न्याय देणार आहे. त्यांनी सांगितलं की, विचारायचं कारण नाही. न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सांगितले.

व्यक्तिगत लेव्हलला. भावनिक लेव्हलला मी राज ठाकरेंना भेटलो. मनात जे होतं ते बोललो. कागद दाखवला. मी काही अपेक्षा केली नाही. मराठी माणसाच्या पाठी ते भक्कम राहिले आहेत. ते सरळ बोलणारे नेते आहेत. त्यांच्याक़डून अपेक्षा आहे. मी बोलून दाखवलं नाही. ते मला पाठिंबा देतीलच, असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी बोलून दाखवला. अजितदादांच्या विमान अपघात की घातपात याविषयी रोहित पवार हे जनतेशी संवाद साधत होते. आता ते विविध पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधत असल्याचे दिसते. त्यांनी याविषयावर राज ठाकरे यांची आज भेट घेतली. ते अजून कोणत्या नेत्याला भेटतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.