राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना न बोलू देताच आटोपली पत्रकार परिषद
नेत्यांची कुजबूज अन् खंत सगळंच कॅमेऱ्याने टिपलं
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना न बोलू देताच पत्रकार परिषद आटोपती घेतली.
विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच नेत्यांमध्ये कुजबूत सुरू होती ती देखील आता व्हायरल झाली आहेत. पत्रकार उलटे पालटे प्रश्न विचारतील तेव्हा त्यांना मनस्थिती ठीक नाही म्हणून सांगा, याशिवाय माणसांनी अजित पवार होते तेव्हा त्यांच्यापर्यंत पोहचू दिलं नाही आता वहिनींजवळ तरी जाऊ द्या असं बोलताना आमदार सरोज अहिर यांचा व्हिडिओ समोर आला आहे.
दादा जवळ कधी जाऊ देण्याची संधी दिली नाही, माणसांनी वहिनी जवळ तरी जाऊ द्यावं. त्यावेळी दुसरे नेते म्हणतात, प्रश्न घेऊ नका तुमचा बोलून झालं की थांबा, हे चांगलं केलं, स्पेशली प्रश्न करू नका, म्हणा मनस्थितीत नाहीत असं सांगा, बोलायचं आपलं आणि उठायचं, हे उलटे पालटे प्रश्न विचारतील ना, प्रेशर करतील तेव्हा तुम्ही उठवा, आम्ही थांबतो इथं बाजूला, बोलू नका माईक चालू आहे, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची कुजबूज कॅमेरात कैद झाली आहे. त्याचवेळी सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी दाखल झाले, त्यावेळी सुनेत्रा पवार यांना सांगितलं, तुमचं स्टेटमेंट करायचं तुम्ही, त्याच्या पलीकडे आम्ही बोलू. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली आणि पत्रकार प्रश्न विचारण्याआधीच सगळे नेते उठले प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना म्हटलं तुम्ही निघा, त्या गेल्यानंतर पुन्हा प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी खाली बसले. ही सगळी घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलं. आजचा प्रसंग माझ्यासाठी वेदना आहे, हा क्षण माझ्यासाठी लाखो कार्यकर्त्यांची जबाबदारी स्वीकारणारा आहे. मी पक्षाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. आपल्या सर्वांचे लाडके नेते अजित दादा यांच्या अकाली जाण्याच्या अपार दुःखातून आपण अजूनही सावरलो नाहीत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी झाली असून ती भरून निघण्यासारखी नाही, असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पहिलंच भाषण केलं. यावेळी, त्यांचा कंठ दाटला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझा परिवार असून समाजातील कोणत्याही घटकाला मी वाऱ्यावर सोडणार नाही, असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन आपण पुढे जाणार असल्याचे स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.