जन्म-मृत्यू नोंदणीच्या निकालासाठी पाच हजारांची लाच घेताना प्रांताधिकारी कार्यालयातील लघुलेखकाला अटक
विट्यात सांगली एसीबीची कारवाई : उपाधीक्षक इनामदार
सांगली : खरा पंचनामा
जन्म-मृत्यू नोंदणीच्या पाच प्रकरणांच्या निकालासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना प्रांताधिकारी कार्यालयातील लघुलेखकाला अटक करण्यात आली. शुक्रवारी दुपारी विटा येथे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सांगली एसीबीच्या (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली.
रमेश आण्णा शिंदे (वय ५५, पद लघुलेखक, निम्न श्रेणी, वर्ग-३, उपविभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी कार्यालय विटा उप विभाग विटा, रा. सर्वे नं.१६/२ श्रीनिवास, संभाजीनगर, सांगली-पेठ रोड, इस्लामपूर ता. वाळवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी त्यांचे पक्षकांरा मार्फत जन्म-मृत्यु नोंदणीचे अर्ज वकीलपत्र घेवून प्रांत कार्यालय विटा येथे दाखल केले होते, त्यापैकी झालेल्या ४ अर्जाच्या निकालाचे व प्रलंबित १ अर्जाच्या निकालांचे असे प्रत्येकी एक हजार रूपयेप्रमाणे एकूण ५ हजार रूपये लाचेची मागणी केलेबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी शुक्रवारी रोजी सांगली एसीबीकडे दिला होता.
तक्रारीची पडताळणी केल्यावर शिंदे यांनी पाच हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज दुपारी त्यांना पाच हजारांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली.
सांगली एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश चव्हाण, किशोरकुमार खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील, रामहरी वाघमोडे, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, सीमा माने, सागर नायकुडे, विना जाधव, अमर शेस्वरे, चालक विठ्ठलसिंग राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.