Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सीआयडीला बदनाम करण्याची फॅशन झाली आहे उज्वल निकम यांचा आरोप : अनिकेत कोथळे खून प्रकरण

सीआयडीला बदनाम करण्याची फॅशन झाली आहे 
उज्वल निकम यांचा आरोप : अनिकेत कोथळे खून प्रकरण 

सांगली : खरा पंचनामा 

अनिकेत कोथळे खून प्रकरणात सीआयडीला बदनाम करण्याची फॅशन झाली आहे, असा आरोप विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तिवाद करताना केला. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश पडवळ यांच्या कोर्टात सुरु आहे. या सुनावणीवेळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे तसेच सीआयडीच्या पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची उपस्थिती होती. 

अनिकेत कोथळे खून खटल्याच्या सुनावणीत आज शुक्रवारी पुढील युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले, पोलीस स्टेशनमध्ये पाच पोलिसांनी मिळून एका मुलाची हत्या केली. ती बॉडी आंबोली घाटातील जंगलात जाळण्यात आली होती. अनिल लाड यांनी हे ठिकाण स्वखुशीने पोलिसांना दाखविले होते त्या ठिकाणी पोलिसांना एक जळालेली बॉडी, कवटी, हाडे, राख मिळून आली होती, असे पंच, साक्षीदार प्रवीण वाले यांनी सांगितले होते. मृतदेह जाळलेली जागा ही संशयित आरोपींच्या खास माहितीतील होती असेही निकम यांनी स्पष्ट केले. तसेच बचाव पक्षाच्या वकिलांचे जे म्हणणे आहे की स्टायिकिंग फोर्सचे पोलीस घटनेच्या ठिकाणी अगोदरच होते हे म्हणणेही पूर्णपणे चुकीचे आहे. केवळ स्टायकिंग फोर्सच्या प्रवासी भत्त्याच्या बिलांच्या आधारावर घटनास्थळी पोलीस अगोदरच होते, असे म्हणता येणार नाही असे निकम म्हणाले. 

तुम्हाला कोणाला तपासायचे आहे का अशी विचारणा देखील युवराज कामटे याला केली असता त्यांनी नाही असे सांगितले होते. तसेच तसेच स्टाईकिंग फोर्स च्या वाहनांची तपासणी जेव्हा केली होती तेव्हा सकाळी सर्व वाहने सांगलीतच होती हे दिसून आले होते. तसेच जेव्हा एखादी बॉडी लपवली जाते तेव्हा काही शक्यता असू शकतात जसे की, आरोपीने बॉडी लपवली ही जागा पोलिसांना कळालेली असू शकते, अगर आरोपीने ही बॉडी ठेवली याची माहिती पोलिसांना कुणीतरी दिली असू शकते. यावेळी निकम यांनी न्यायालयात काही न्यायनिवाडे देखील हजर केले. पंचनामावेळी मृतदेहाच्या शरीराची भाग पोलिसांनी का हस्तगत केले नाहीत अशी देखील पोलिसांना विचारणा झाली होती. तेव्हा त्या ठिकाणी अंधार झाल्यामुळे पुढे तपास करणे शक्य नव्हते असे पोलिसांनी स्पष्ट केले होते असे निकम यांनी सांगितले होते. तसेच संशयतांनी मृतदेह कुणाला समजणार नाही अशा आड मार्गाने जंगलात नेला व आंबोली येथील जंगलात जाळला. मात्र परत दुसऱ्या रस्त्याने येताना त्या रस्त्यात सीसीटीव्ही कॅमेरा आहे हे संशयितांच्या लक्षात आले नाही व त्यांची गाडी सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे परत येताना दिसून आली. या संदर्भात कोगनोळी टोलनाका येथील ऑडिटर नरेंद्र जोशी यांनी आरोपीचा गुन्ह्यातील गाडीचा ट्रॅकिंग रिपोर्ट हजर केला होता. तसेच यातील प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे यांनी देखील गुन्ह्याच्या वापरातील गाडीत मला बसवून नेले व त्या ठिकाणी कोथळेचा मृतदेह जाळून कोगनोळी या टोल नाक्याकडून परत आलो असे सांगितले होते. 

आज निकम यांच्या युक्तिवादावेळी न्यायालयात प्रचंड गर्दी जमली होती. निकम यांनी सलग सुमारे तीन तास युक्तिवाद केला. दोन डॉक्टर्स व दोन घड्याळे तसेच दोन वकील हे कधीही एकमेकांशी सहमत होत नाहीत असे म्हणताच न्यायालयात एकच हषा पसरला. 

यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी, सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक प्रमोद नलवडे, अमोल ठाकूर यांनी सरकार पक्षाला मदत केली. या सुनावणी मधील पुढील युक्तिवाद उद्या चालू राहणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.